
Solapur News : मागील गाळप हंगाम संपून सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. आगामी ऊस हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तरीही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकीत एफआरपी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८०.९१ कोटी रुपये एफआरपी थकीत असल्याचे साखर आयुक्तालयाकडील अहवालावरून दिसते.
गतवर्षी राज्यात २०० कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता.त्यामध्ये ८५५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्या उसाची २४ हजार ५११ कोटी रुपये एफआरपी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. तथापि, राज्यातील ६० कारखान्यांकडे जुलैअखेर अद्यापही ३८७ कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे.
एफआरपी थकविण्यात सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर जिल्हा दुसऱ्या तर कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३३ कारखान्यांनी मागील गाळप हंगाम घेतला होता. त्यामध्ये एक कोटी चार लाख ७६ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ८८ लाख २८ हजार ७७६ क्विंटल साखर उत्पादन झाले होते.
जिल्ह्यात गाळप झालेल्या उसाचे दोन हजार ७१६ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यातील नऊ कारखान्यांकडे ८१ कोटी रुपये एफआरपी थकीत असल्याचे दिसून येत आहे .हंगाम सुरू होताना जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस मिळविण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रतिटन २७०० ते ३५०० रुपयांदरम्यान ऊसाचा पहिला हप्ता जाहीर केला होता.
हंगाम संपल्यावर रिकव्हरीनुसार बहुतांश साखर कारखान्यांची एफआरपी त्यांनी जाहीर केलेल्या ऊसदरापेक्षा कमी निघाली. जाहीर केलेल्या ऊसदराप्रमाणे केवळ १४ कारखान्यांनीच शेतकऱ्यांना ऊसबिले दिली आहेत. १९ कारखान्यांकडे प्रत्यक्षात अजूनही २१७ कोटी रुपयांची ऊसबिले अडकली आहेत.\
जिल्हानिहाय थकीत एफआरपी(कोटीत)
जिल्हा कारखाने थकीत
सोलापूर ९ ८०.९१
अहिल्यानगर ७ ५७.९०
कोल्हापूर ८ ३८.८१
पुणे ४ ३१.९१
सांगली ५ २७.००
सातारा ३ २५.९७
जालना ३ २४.४३
परभणी ४ २२.८१
हिंगोली ३ २१.२८
लातूर ४ १८.२५
नांदेड ४ १५.२२
नाशिक १ ९.२९
धाराशिव २ ४.९७
बीड ३ ४.५६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.