
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील बहुतांश भागात सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाने तुरळक, हलकी, मध्यम तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार मंडलांत अतिवृष्टी झाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी २२.८ मिलिमीटर तर फुलंब्री तालुक्यात सरासरी ३३.९ मिलिमीटर पाऊस झाला.
पैठण तालुक्यात सरासरी ७.८ मिलिमीटर, गंगापूरमध्ये ३.६ मिलिमीटर, वैजापूरमध्ये २.४ मिलिमीटर, कन्नडमध्ये ३.६ मिलिमीटर, खुलताबादमध्ये ६.४ मिलिमीटर, सिल्लोडमध्ये ७.४ मिलिमीटर तर सोयागावमध्ये सरासरी ३.८ मिलिमीटर पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तुलनेत जालना जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा कमी होता. जिल्ह्यातील जालना तालुक्यात सरासरी ३.६ मिलिमीटर, बदनापूरमध्ये ६.६० मिलिमीटर, भोकरदनमध्ये ८ मिलिमीटर, जाफराबादमध्ये ८.७० मिलिमीटर, परतूरमध्ये ५.१० मिलिमीटर, मंठामध्ये ४.९० मिलिमीटर, अंबडमध्ये ५.१० मिलिमीटर, घनसावंगीत सरासरी ६.१० मिलिमीटर पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आळंद परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस झाला.सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर(भवन) परिसरात बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली.
सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर भवन, पिंपळगाव पेठ, वरुड, पिंपरी, बोरगाव कासारी, तलवाडा, गव्हाली आदीं परिसरामध्ये शेतकऱ्यांनी शेतात मका, सोयाबीन, कापूस, तूर,आद्रक, भुईमूग, उडीद, मूग आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली.
१५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची शेतातील पूर्ण कामे उरकली. शेतकरी पिकासाठी पावसाची प्रतीक्षा करीत होते.काही शेतकऱ्यांनी पिकांना पाणी चालू केले होते. परिसरातील पिके पावसाअभावी कोमेजू लागली होती.
मात्र, सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील पिकांना जीवदान मिळाले. आता शेतकऱ्यांची पाणी देण्याची चिंता मिटल्याने बळिराजा आनंदात आहे. ढोरकीन परिसरातही पावसाची रिपरिप झाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीची मंडले
पीसादेवी ७०, वरुडकाजी ७०, भराडी ६५.८, फुलंब्री ६८.५.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.