Maharashtra Budget Session 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Monsoon Session LIVE : '५० खोके, एकदम ओके' च्या पुन्हा घोषणा... विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन

Monsoon Session 2023 : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.

Team Agrowon

Pavsali Adhiveshan Live updates : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाचा पहिला दिवस सत्ताधारी गाजवणार की विरोधक, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, विधीमंडळाच्या बाहेर पुन्हा 'पन्नास खोके, एकदम ओके' अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून निघाला.

पहिल्या दिवशी विरोधकांनी घोषणाबाजी केली. विरोधकांनी घटनाबाह्या कलंकित सरकरचा धिक्कार असो असा फलक हातात घेतला होता. यावेळी अंबादास दानवे, भाई जगताप, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुनील केदार व शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

विधीमंडळाच्या बाहेर आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार सहभागी झाले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पक्षप्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विरोधी बाकांवर बसण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद म्हणून पक्षातील आमदारांना व्हीप जारी केला आहे. आंदोलनात सहभागी न झाल्याने शरद पवार गटाचे आमदार कुठे आहेत? असा प्रश्न सगळ्यांच पडला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

Paddy Production: जावळीत यंदा भाताच्या उत्पन्नात ५० टक्के घट

Farmer Awareness: शेतमाल नोंदणीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

E Crop Survey: ई-पीक पाहणीत शेतमालाची नोंदच नाही

SCROLL FOR NEXT