Election  Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : दिवाळीच्या तोंडावर ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

Local Body Election : सोलापूर जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या १०९ ग्रामपंचायती आणि ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, येत्या १६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या १०९ ग्रामपंचायती आणि ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, येत्या १६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.

५ नोव्हेंबरला मतदान आणि दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागात ही रणधुमाळी रंगणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. त्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित आणि २०२२ मध्ये निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

राज्यातील २२९६ ग्रामपंचायतींपैकी सोलापूर जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतींची निवडणूक, तर ५० गावांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता दिवाळीच्या आधी अगदी तोंडावरच गावागावांत निवडणुकीची ही रणधुमाळी रंगणार आहे.

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत पडलेले दोन गट आणि दुसरीकडे भाजप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी असा राजकीय सामना रंगणार आहे.

असे असले तरी गावपातळीवर राजकीय पक्षांना फारसे महत्त्व नसते. स्थानिक गटा-तटातच या निवडणुका रंगत असतात. पण तरीही बदलत्या राजकीय परिस्थितीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

...असा असेल निवडणूक कार्यक्रम

या गावांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. या अर्जांची २३ ऑक्टोबरला छाननी होईल. २५ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणुका होणारी तालुकानिहाय गावे...

अक्कलकोट : दहिटणे, हसापूर, जेऊरवाडी, करजगी, नन्हेगाव, तळेवाड, कुडल, केगाव बु., बिजगेर, केगाव खु., कलकर्जाळ, जकापूर, शावळ, कंटेहळ्ळी, धारसंग, म्हैसलगे, रामपूर इटगे, घुंगरेगाव, बार्शी- उंडेगाव, मुंगशी वा, आंबाबाईची वाडी, चिंचोळी ढेंबरेवाडी, घारी, करमाळा -भगतवाडी, जेऊर, राजुरी, चिखलठाण, गोंडरे, उंदरगाव, कंदर, कोर्टी, निंभोरे, केतूर, वीट, रामवाडी, घोटी, रायगाव, कावळवाडी, केम.,

माढा- पिंपळखुंटे, आढेगाव, अंजनगाव खे, अंबाड, वडशिंगे, मुंगशी, लोणी नाडी, कन्हेरगाव, तुळशी, चांदज, वडोली, टेंभूर्णी, रोपळे क, पिंपळनेर, माळशिरस- माळीनगर, धर्मपुरी, कारुंडे, वाफेगाव, देशमुखवाडी, कन्हेर, लवंग, कोंढारपट्टा, सवतगव्हाण, दहिगाव,

मंगळवेढा : शिरसी, अकोले, जंगलगी, खडकी, खुपसंगी, जुनोनी, महमदाबाद, बटाण, अंदळगाव, शेलेवाडी, उचेठाण, ब्रह्मपुरी, निंबोणी, मुंढेवाडी, जालीहाळ, नंदूर, चिक्कलगी, भाळवणी, हिवरगाव, रेडे, लक्ष्मीदहिवडी, लोणार, मानेवाडी, डिकसळ, पडोळकरवाडी, रेवेवाडी, देगाव,

सांगोला : खवासपूर, सावे, चिकमहुद, वाढेगाव.,

दक्षिण सोलापूर : गावडेवाडी, शिरवळ, कासेगाव, वळसंग, कुसूर, दोड्डी, तिल्लेहाळ, औज आ, उळेवाडी, उळे, मोहोळ : मलिकपेठ, जामगाव खु, पंढरपूरः गुरसाळे, ईश्‍वरवठार, पुळूज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT