Gram Panchayat Election : जुन्नरमध्ये २६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Pune Gram Panchayat Election : जुन्नर तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच तसेच सदस्यपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune News : जुन्नर तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच तसेच सदस्यपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता. ६) या बाबतची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून, १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. येत्या ५ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ६ तारखेला निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार सरिता रासकर यांनी दिली.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : आंबेगावमधील ३० ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

दरम्यान या २६ ग्रामपंचायतींसोबत वानेवाडी येथे सरपंच आणि सदस्य पदासाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तर काले, भिवाडे बुद्रुक, अहिनवेवाडी, खिल्लारवाडी, मढ, हातविज, उंडेखडक, अंजनावळे, माणिकडोह, खानापूर, पिंपळगाव तर्फे नारायणगाव आंबोली, उच्छिल व सोमतवाडी या १५ गावांमध्ये सदस्यांच्या रिक्त पदांसाठी निवडणुका होत आहे.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : सांगलीत ९४ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

निवडणुका जाहीर गावांमध्ये झालेल्या मंगळवार (ता. ३)पासून आचारसंहिता लागू झाली आहे. आता उमेदवारांना प्रचारासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांची आवश्यक कागदपत्रे जमविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. उमेदवारांना जातीचे दाखले, कर भरल्याच्या पावत्या, शौचालय दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला तसेच स्थावर मालमतेचे प्रतिज्ञापत्र आदींसाठी लगबग सुरू आहे.

तालुक्यात सव्वीस ग्रामपंचायती

सांगणोरे, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, वडगाव आनंद, पिंपळवंडी, निमगिरी, खटकाळे, खामगाव, धालेवाडी तर्फे मिन्हेर, राळेगण, सुकाळवेढे, पाडळी, बुचकेवाडी, पारुंडे, कांदळी, नारायणगांव, शिरोली तर्फे आळे, गुंजाळवाडी, बांगरवाडी, गुळंचवाडी, बेल्हे, रानमळा, पिंपरी कावळ, उंब्रज नं. १, पांगरी तर्फे मढ, तांबेवाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com