Pune News : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असून मंगळवारी (ता.९) विरोधकांनी आक्रमक पणा दाखवला. अधिवेशनाच्या १० व्या दिवशी अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येणार होती. मात्र यादरम्यान मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि सर्व खात्याचे मंत्र्यांच्या अनुउपस्थिवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी विरोधी पक्षनेते बोलतना किमान मुख्यमंत्री नाही तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संबंधीत खात्याचे मंत्री आणि सचिवांची उपस्थिती हवी. पण मंत्री नाही तर सचिव देखील सभागृहात नसतात. या अधिकाऱ्यांना २०१४ पासून सरकारने डोक्यावर बसवून घेतल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. तर ज्या खात्याशी निगडीत चर्चा आहे, त्या मंत्र्यांची उपस्थिती पाहिजे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी विरोधकांच्या आक्षेपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, आपण येथे उपस्थित असून अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे सभागृहात चर्चा करावी अशी विनंती केली. तर विरोधकांच्या आक्षेपावर गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार करताना याच्या आधी देखील असेच कामकाज चालत असल्याचे म्हटले. यावरून जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब करावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते.
वडेट्टीवारांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेत, आम्ही प्रश्नोत्तरांची यादी काढली असून तेथे आरोग्य मंत्र्यांचे काय काम? असा सवाल केला. तर अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी सभागृह स्थगित करावं, अशी मागणी वडेट्टीवार यांनी करताना, सभागृहाला सध्या गांभीर्य दिसत नसल्याची खंतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन
दरम्यान विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होण्याआधी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. भ्रष्टाचार आणि क्लीन चीट देण्यावरून विरोधकांनी भाजपवर निशाना साधला. तर भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये नेत्यांना स्वच्छ करून क्लीन चीट दिली जाते, असा आरोप विरोधकांनी सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केला.
अधिवेशाला मुदवाढ मिळण्याची शक्यता
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून ते १२ जुलैला संपणार आहे. तर अजून अनेक विषयांवर चर्चा होणे बाकी आहे. त्यावरून सभागृहातील कामकाजाचे दिवस वाढवण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे. सोमवारी मुसळधार पावसामुळे अनेक आमदार आणि मंत्री सभागृहात पोहचू शकले नव्हते. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज १ दिवसासाठी तहकूब करण्यात आले होते. तर कामकाज अधिक असल्याने अधिवेशनासाठी २ ते ३ दिवसांची वाढ करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे अधिवेशाचे दिवस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.