Pune News : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा सोमवार (ता.१) चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाचे कामकाज सुरू होण्याआधीच विरोधकांनी आक्रमकपणा दाखवत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी देशभरात पेपर फुटी प्रकरणारून विरोधकांनी परिसर घोषणांनी दणादणून सोडला. तर पेपर फुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे, अशी मागणी केली. मात्र या वेळी सत्ताधारी आमदारांनी देखील पायऱ्यांवर येत घोषणाबाजी केल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
यावेळी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, अनिल देशमुख, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, रोहीत पवार, जयश्री जाधव, आमदार राजू आवळे उपस्थित होते. तर सत्ताधारी आमदारांमध्ये भरतशेठ गोगावले, दादा भूसे, गुलाबराव पाटील, राम कदम, अशिष शेलार, प्रताप सरनाईक यांच्यासह इतर आमदार उपस्थित होते.
राज्याच्या पावसाळी अधिवेशानाला सुरूवात झाली आहे. महायुतीच्या सरकारच्या अधिवेशाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी देशभरात पेपर फुटी प्रकरण उचलत धरले. तसेच कामकाजाच्याआधीच विधाभवन पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारला घेरणार असल्याचा इशारा दिला. तर पेपर फुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी विरोधकांनी हातात 'नीट परीक्षेची नीट चौकशी झालीच पाहिजे, पेपर फुटतोय सदा-कदा, या फुटीवर विरोधा कायदा करा, पेपर फुटी आहे काहींचा धंदा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा होतोय वांदा' अशा आशयांचे फलक घेऊन सरकाचे लक्ष वेधले.
तर विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, विद्यार्थ्यांच्या आकांक्षावर पाणी फेरणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, नीट परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पेपर फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असोया सरकारचं करायचं काय खाली डोक वर पाय अशा घोषणांनी परीसर दणादणून सोडला. दरम्यान पेपर फुटी प्रकरणावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू असतानाच सत्ताधारी आमदार आणि विरोधक आमणे-सामणे आले. तर समोर उभारण्यासाठी गोंधळ घातला. यामुळे पायऱ्यांवर एकच गोंधळ उडाला होता.
पेपर फुटीवरून विरोधक जोरदार आंदोलन करत असतानाच सत्ताधारी आमदार भरतशेठ गोगावले यांनी पायऱ्यांवर जागा देण्याची मागणी केली. त्यावरून अंबादास दानवे यांनी इशारा केल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी आपल्या बॅनरसह विरोधकांच्या समोर उभे झाले. त्यावरून गोंधळ उडाला. तर विरोधक आमदारांनी पुन्हा पुढे जात खाली बसून सरकारविरोधाक जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सत्ताधाऱ्यांच्या समोर उभं राहत नीट परीक्षेची नीट चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या बॅनरचा विषय
सत्ताधाऱ्यांनी अर्थ संकल्पातला संकल्प अशा आशयाची बॅनर आणला होता. यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकराच्या काळातला अर्थ संकल्प असे लिहलं आहे. तर दोन्ही अर्थ संकल्पातला फरक ओळखा असे म्हटले आहे. यावरून अशिष शेलार यांनी, मोदी यांच्या नेतृत्वात महायुती सरकार राज्याला चांगल्या योजना देत आहेत. मात्र विरोधात असणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला कोविडमधील घोटाळे, टोमण्यांशिवाय राज्याला काहीच दिलं नाही, अशी टीका केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.