Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam Capacity : उजनी धरण १०० टक्के भरले

Ujani Dam Water Level : रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर उजनी धरण शनिवारी (ता.९) रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर संध्याकाळी १०० टक्के भरले.

Team Agrowon

Pune News : रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर उजनी धरण शनिवारी (ता.९) रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर संध्याकाळी १०० टक्के भरले. पाटबंधारे विभागाने सायंकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, धरणातील पाणीसाठा ११७.११ टीएमसीवर पोहोचला होता.

यावेळी साठा ९९.७८ टक्के होता. त्यात रात्रीपर्यंत वाढ होत गेली व धरण भरले. धरण भरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणाच्या पाणलोट परिसरात झालेल्या सलग पावसामुळे पाणीपातळी सातत्याने वाढली.

गेल्या काही दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसाला लाखो घनमीटर पाण्याची वाढ होत होती. उजनी धरण भरल्यामुळे पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. यामुळे खरीप पिकांच्या वाढीसाठी आणि रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा निश्चित झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचा पाण्यावरील ताण कमी होणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने धरण ‘ओव्हरफ्लो’ होण्याचा अंदाज आहे.

उजनीतून होत असलेला विसर्ग

भीमा नदीतून विसर्ग - बंद

वीजनिर्मितीसाठी - बंद

सीना माढा बोगदा - १८० क्यूसेक

दहिगाव उपसा सिंचन योजना - ८० क्यूसेक

मोठा बोगदा - ४०० क्यूसेक

मुख्य कालवा - १३०० क्यूसेक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Economic Survey: अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ९ हजार कोटी मंजूर; आर्थिक पाहणी अहवालात सरकारची माहिती

Sugarcane Production : उन्हापासून उसाचे उत्पादन वाचवण्यासाठी सेंद्रिय उपाय

Khapli Wheat: खपली गहू पेरणीत खानदेशात घट

Onion export India : कांद्याचे १५०, द्राक्षाचे ३०० कंटेनर अडकले; इराण आणि इस्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे निर्यात ठप्प, शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका

Gharkul Yojana: राज्यात एका वर्षात जवळपास ४ लाख घरकुले पूर्ण, हा आजपर्यंतचा विक्रम- जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT