Sunil Tambe Agrowon
ॲग्रो विशेष

Sakal Swasthyam 2023 : ओंकार हा ‘ऑल इज वेल’सारखा मंत्र

Omkar Chanting : ‘‘ओंकार हा ‘ऑल इज वेल’सारखा आहे. नियमित ओंकार गायनातून मनाला शांती मिळते. प्रत्येक माणसाचा आत्मविश्वास वाढायला निश्चित मदत होते.

Team Agrowon

Pune News : ‘‘ओंकार हा ‘ऑल इज वेल’सारखा आहे. नियमित ओंकार गायनातून मनाला शांती मिळते. प्रत्येक माणसाचा आत्मविश्वास वाढायला निश्चित मदत होते. कारण, ओंकार हा सर्वव्यापी आहे. तो परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग आहे.

संस्कृत न येणाऱ्या आणि नव्याने साधनेला सुरुवात करणारा साधकही आध्यात्मिक साधनेपासून दूर राहू नये, यासाठी श्रीगुरू बालाजी तांबे यांनी ओंकार गायनाची सोपी पद्धत विकसित केली आहे,’’ अशा शब्दांत ‘संतुलन आयुर्वेद’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे यांनी ओंकार गायनाचे महत्त्व शनिवारी (ता. २) विशद केले.

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत आयोजित सत्रात ते बोलत होते. तांबे म्हणाले, ‘‘आपण सामान्यतः आडवा ओमचं वापर करण्याची असलेली विधानं आहे.लिहिलेला सर्व ठिकाणी पाहतो. तो देवनागरीतील आहे. वैदिक ओम हा उभा लिहिला जातो.’’

वैदिक ओमचा अर्थ काय?

ध्यानमुद्रेमध्ये बसलेल्या साधकाची प्रतिमा वैदिक ओममध्ये दिसते.

‘अ’कार, ‘उ’कार आणि ‘म’कार या तीन वर्णांनी ‘ओंकार’ तयार होतो.

वैदिक ओममध्ये ‘अ’ हा सर्वांत खाली असतो. तो पृथ्वी तत्त्वाचे प्रतीक असतो.

‘उ’ जल आणि अग्नी तत्त्वाचे प्रतीक आहे.

‘म’ हा आकाश आणि वायू तत्त्वाचे प्रतीक मानला जातो.

ओंकार गायनाचे प्रकार

ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत अशा तीन पद्धतींनी ओंकार गायला जातो.

ऱ्हस्व : हा ओंकार म्हणताना साधकाचे पोट लोहाराच्या भात्याप्रमाणे आत-बाहेर होते. या प्रकारचा ओंकार करताना कपालभातीदेखील होते.

दीर्घ : हा ओंकार लोम-विलोमाप्रमाणे शरीरावर कार्य करतो. हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढण्यासाठी याचे महत्त्व अधिक असते.

ओंकाराचे महत्त्व काय?

पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या शरीरात संतुलन आवश्यक असते. त्यासाठी ओंकार महत्त्वाचा असतो.

नियमित ओंकार गायनातून मानसिक शांतता मिळून व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.

नियमित ओंकारातून घरात आणि परिसरात सकारात्मक ऊर्जा मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Withdraws COP33 : भारताने 'सीओपी ३३'च्या यजमानपदाचा प्रस्ताव मागे घेतला; २०२३ साली पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली होती इच्छा

Urea Black Marketing: शेतकऱ्यांसाठीचा युरिया औद्योगिक वापरासाठी वळवला, काळाबाजार रोखण्यासाठी कोकण विभागात कारवाईचा बडगा

Goat Feeding Management: उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या आहाराचे नियोजन

Agriculture Producets Process: पॅकहाउसमध्ये शेतीमाल स्वीकारण्याची प्रक्रिया

Millet Business: मंजूषा यांचा ‘मिलेट्‍स’ उद्योग नावारूपाला

SCROLL FOR NEXT