Olam Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Olam Sugar Factory : ओलम साखर कारखान्याकडून आता मका व तांदळापासून इथेनॉल निर्मिती

Ethanol Maize Rice : मका व तांदळापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याने स्थानिक रोजगार वाढीला चालना मिळणार आहे.

sandeep Shirguppe

Ethanol Price : ओलम साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ६ लाख ४१ हजार १११ टन उसाचे गाळप केले आहे. आगामी काळात मका व तांदळापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याने स्थानिक रोजगार वाढीला चालना मिळणार असल्याचे, मत ओलमचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी व्यक्त केले.

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. नामदेव पाटील यांनी प्रास्ताविक केले.

शेती अधिकारी दत्तराज गरड, सशांक शेखर यांनी गळीत हंगामाची माहिती दिली. यावेळी सर्वाधिक उसाची वाहतूक करणाऱ्या १२ वाहतूकदारांचा सत्कार केला.

कुंडल म्हणाले, 'ऊस दर चांगला असल्याने शेतकऱ्यांनी अधिकाधिक ओलमला उसाचा पुरवठा केला. कुणी काहीही सांगितले तरी शेतकऱ्यांचा कारखान्याच्या कामकाजावर विश्वास आहे. ओलमने शेतकऱ्यांना आजपर्यंत दिलेला शब्द कधीही फिरवला नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा नेहमी प्रयत्न राहिला आहे.

आता मका व तांदळापासून इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या नव्या प्रकल्पामुळे उसाबरोबर आता मका व तांदूळ पिकालाही चांगले दिवस येणार आहेत. यामुळे स्थानिक रोजगार वाढीला चालना मिळणार आहे.'

यावेळी एचआर नीता लिंबोर, अनिल पाटील, संतराम गुरव, भागोजी लांडे, राजू निर्मले, रवळनाथ देवण, रणजित सरदेसाई, जयदीप जैन आदी उपस्थित होते. सतीश कागणकर यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Interlinking Scheme: नद्याजोड प्रकल्प रखडले; निधी वापरावर संसदीय समितीकडून नाराजी व्यक्त

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा,कापूस टिकून, हळद स्थिर, कलिंगड आवकेत वाढ, मका दबावातच

Sugarcane Crop Disease: उसातील मर, रेड रॉट, येलो लीफ रोगाचे नियंत्रण

Rain Crop Damage: अहिल्यानगरमधील पाच तालुक्यांत पावसाने शेतपिकांचे नुकसान

Solar Cold Storage: सांगली येथे ‘इकोफ्रॉस्ट’ सौर शीतगृह सुरू

SCROLL FOR NEXT