Citrus Estate  Agrowon
ॲग्रो विशेष

Citrus Estate : लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचा सिट्रस इस्टेटला खोडा

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : सिट्रस इस्टेटला गती देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत असतानाच या प्रयत्नांना खिळ घालण्याचे काम खुद्द नागपूरातील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेकडून होत असल्याचे धक्‍कादाक वास्तव समोर आले आहे.

संत्रापट्टयात कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, दर्जेदार कलमांचा अभाव यासह इतर कारणांमुळे संत्र्याची उत्पादकता प्रभावित झाली आहे. त्यामुळेच संत्रा बागायतदारांना लागवड ते काढणी आणि बाजारपेठ अशा विविध टप्प्यांवर मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सिट्रस इस्टेटची संकल्पना मांडण्यात आली. पंजाबमध्ये यापूर्वीच या संकल्पनेवर काम सुरू आहे.

त्याच पॅटर्नची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणे अपेक्षित होते. त्यानुसार संस्था नोंदणी करण्यात आली. परतु गेल्या चार वर्षांत हा प्रकल्प तसूभरही पुढे सरकला नाही. त्यामध्ये इतर कारणांसोबतच ‘सीसीआरआय’ ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था देखील अडसर ठरली आहे. सिट्रस इस्टेटला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय फळपिकातील विविध प्रजातींची माहिती त्यासोबतच त्या जातीच्या रोपांची उपलब्धता व्हावी याकरीता मातृवृक्षांची गरज राहते.

त्यानुसार १२ प्रजातीच्या मातृवृक्षांची मागणी रितसर पत्राद्वारे करण्यात आली होती. उमरखेड येथील सिट्रस इस्टेटकरिता २५० तर चांदूरबाजार येथील सिट्रस इस्टेटसाठी ५५० याप्रमाणे मातृवुक्षांची मागणी करण्यात आली. मात्र ३० एप्रिलपासून ‘सीसीआरआय’कडून याला प्रतिसाद मिळालेला नाही. कृषी विभागाच्या उपक्रमांना सहकार्य तर दूरच त्यांच्या पत्राला साधे उत्तरही या काळात ‘सीसीआरआय’कडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीला खिळ बसली आहे.

संचालकांचा प्रतिसाद नाही

केंद्रिय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांचे या विषयावर मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अशी होती मातृवृक्षाची मागणी जात (उमरखेड आणि चांदूरबाजार सिट्रस इस्टेटसाठी)

संत्रा नागपूरी ५०--२५०

मोसंबी न्युसेलर ०--१००

फ्लेम ग्रेपफ्रूट २०--२०

स्टार रुबी २०--२०

पमेलो ५ २०--२०

युएस १४५ पमेलो २०--२०

मार्श सीडलेस २०--२०

रेड ब्ल्युश २०--२०

वॉशिग्टन नॉवल २०--२०

वेस्टीन २०--२०

कटर व्हॅलेनसिया २०--२०

एनआरसीसी ५ २०--२०

विदर्भातील संत्रा बागायतदारांना नागपुरी संत्र्याला पर्यायी वाण तसेच उत्पादकता वाढीसाठी तंत्रज्ञान ‘सीसीआरआय’च्या माध्यातून उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. परंतु संस्था स्थापनेच्या गेल्या ३० ते ३५ वर्षांत एकही तांत्रिक शिफारस किंवा वाणाचा पर्याय देण्यात संस्था अपयशी ठरली. त्यामुळे या संस्थेला केंद्र सरकारकडून का पोसले जाते? असा प्रश्‍न आहे. सिट्रस इस्टेटसारख्या शासकीय उपक्रमांनादेखील संस्थेचे सहकार्य नसेल तर आता शासनस्तरावरच संस्थेच्या उपयोगितेबाबत चिंतन होणे गरजेचे आहे.
- प्रदीप बंड, संत्रा बागायतदार, जसापूर, चांदूरबाजार, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Bajarbhav : सोयाबीनला ६ हजार भाव देणं सरकारला शक्य; सरकारने १३ हजार कोटी खर्च केले तर सोयाबीनला ६ हजार भाव मिळेल

Chemical Fertilizer : रासायनिक खतांची लिकिंगसह खरेदी बंद

Soybean Crop Damage : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पुन्हा पाण्याखाली

Nano Urea and Agricultural Drones : कृषीत नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होतेय : केंद्रीय मंत्री जोशी

Nar-Par Valley : ‘नार-पार’मधील वाहून जाणारे पाणी करंजवण प्रकल्पात

SCROLL FOR NEXT