New Delhi News: ‘‘कृषी क्षेत्र हे देशाच्या विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. दूध, डाळी आणि ताग उत्पादनात भारत जगात पहिल्या स्थानावर, तर तांदूळ, गहू, कापूस, फळे आणि भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाची कृषी निर्यात चार लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, ही बाब देशाच्या जागतिक स्पर्धेतील क्षमतेचे प्रतिबिंब आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा रोडमॅप सादर केला..७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘मागील आठ वर्षांत वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) देशातील करप्रणालीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या. विविध करांचे ओझे कमी झाले..India Agriculture Export : इंडोनेशियाची भारतातील शेंगदाणा, गव्हावर करडी नजर.त्यानंतर आता आठ वर्षांनंतर काळाची गरज लक्षात घेता, जीएसटीमध्ये नव्याने सुधारणा करण्यात येणार असून, जीवनावश्यक वस्तूंवरील कर मोठ्या प्रमाणात कमी केले जाणार आहेत. सर्वसामान्य ग्राहकांसह स्थानिक विक्रेते तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना त्याचा मोठा फायदा होईल. येत्या दिवाळीपर्यंत ही देशवासीयांसाठी मोठी भेटवस्तू असेल,’’ अशी घोषणा त्यांनी केली..पंतप्रधान म्हणाले, ‘‘विविध गोष्टींसाठी इतरांवर असलेले अवलंबित्व देशाच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. त्यामुळे देशाला स्वावलंबी होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. स्वावलंबन हे केवळ आयात-निर्यात, रुपया-डॉलरसंदर्भात नव्हे, तर आपल्या क्षमतांबद्दल असायला हवे. त्यामुळे या वर्षअखेरपर्यंत भारताची पहिली मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप बाजारात आणली जाणार आहे..India Rice Export : बांगलादेशमुळे १४ टक्क्यांनी वाढले तांदळाचे भाव; भारतातून वाढली तांदूळ निर्यात.तसेच अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करीत पुढील दोन दशकांमध्ये अणुऊर्जेचे उत्पादन दहापटीने वाढवले जाईल. त्यातून देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी खोल समुद्रात इंधनासाठी शोधमोहीम हाती घेतली जाईल. सौर, पवन, जलविद्युत आदी पारंपरिक ऊर्जास्रोतांना बळकट करून परदेशी इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी केले जाईल. हे एकप्रकारे स्वतंत्र आणि शक्तिशाली भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असेल.’’.खोट्या धमक्यांना भीक घालणार नाही‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेचे उत्तम उदाहरण होते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराची प्रशंसा केली. भारतात विकसित शस्त्रास्त्रांचा वापर करून दहशतवादाचे अड्डे आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानातील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या..इतर देशांच्या सल्ल्याने पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या अणुबॉम्बच्या पोकळ धमक्यांना भीक घालणार नाही. सिंधू जल करार हा भारतासाठी अन्यायकारक होता. भारतात उगम पावणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर शत्रू देशाला सिंचनाची सुविधा मिळत होती आणि इकडे मात्र आपला शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहे. मागील सात दशके भारत हा अन्याय सहन करीत आला. आता मात्र ते सहन केले जाणार नाही, अशा शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला..तीन कोटी युवकांना रोजगारतरुणांची सर्वांधिक लोकसंख्या ही देशाची संपत्ती म्हणून ती अधिक विकसित करण्यासाठी आणि युवा वर्गाच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना राबवण्यात येणार आहे. सुमारे एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. याअंतर्गत नव्याने खासगी रोजगार मिळालेल्या युवकांना दरमहा १५ हजार रुपये दिले जातील. तीन कोटी युवकांना रोजगार देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.