Nagpur News: विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाने सोयाबीन, कपाशीसह संत्रा बागांना देखील मोठा फटका बसला आहे. चांदूर बाजार तालुक्यात शुक्रवारी (ता.१५) पावसाने एकच हाहाकार उडाला. शनिवारी (ता.१६) उमरखेड, महागाव, पुसद (यवतमाळ) भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. .यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या विडूळ भागात पाऊस बरसला. गेल्या २५ वर्षांत असा पाऊस बरसला नाही, अशी प्रतिक्रिया महेश्वर बिचेवार यांनी दिली. अनेक भागातील नद्या, नाल्यांची पातळी अचानक वाढल्याने त्यांना पूर आला आहे. काही गावांमध्ये पाणी शिरल्याची माहिती सूत्रांनी दिली..Monsoon Rain: विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता.अतिवृष्टीने घेतला शेतकऱ्याचा बळीरिसोड, जि. वाशीम : तालुक्यातील वाडी रायताळ येथे नाल्याच्या पुरामध्ये एक शेतकरी वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत शेतकऱ्याचे नाव पिराजी किसन गवळी (६९ वर्षे) असे आहे. सदर शेतकरी शुक्रवारी शेतातून परतत असताना नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले. त्यांच्या कुटुंबीयांनी ते रात्री घरी आले नसल्याने त्यांचा शोध घेतला. मात्र, शनिवारी शेताकडे असणाऱ्या नाल्यातील झुडपाला अडकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे..Monsoon Heavy Rain: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता.कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊससातारा : कोयना धरणाच्या क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे, धरण क्षेत्रातील कोयना १०४, नवजा १७४, महाबळेश्वर ११७ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात प्रति सेंकद १९,००८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात शनिवारी सकाळी आठपर्यंत ८९.९३ टीएमसी (८५.४४ टक्के) पाणीसाठा झाला आहे..धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करून २१०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.