Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शेतीपीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत

Unseasonal Rain : वादळ, गारपिटीसह झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. यासह कांदा, मका, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे.

Team Agrowon

Nashik News : वादळ, गारपिटीसह झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. यासह कांदा, मका, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

मंगळवारी (ता. २८) निफाड तालुक्यातील रौळस, पिंपरी आणि कसबे सुकेणे या गावांत मंत्री अनिल पाटील यांनी मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या वेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमंगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, संजय सूर्यवंशी, कृषी सहायक अमोल सोमवंशी, योगेश निरभवणे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री पाटील यांनी मौजे रौळस, पिंपरी आणि कसबे सुकेणे या तीनही गावांत प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी करत बाधित शेतकऱ्यांची विचारपूस केली. या वेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले, की शेतपीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल पाहता नाशिक जिल्ह्यात जवळपास ३३ ते ३४ हजार हेक्टरवर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

निफाड तालुक्यात जवळपास १० ते १२ हजार हेक्टर क्षेत्र नुकसानीखाली आहे. यात द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रत्येक शेतावर जाऊन पंचनामान्याचा जो अंतिम वस्तुनिष्ठ अहवाल तयार होईल तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये. तसेच नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर भरीव प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन मंत्री पाटील यांनी या वेळी बाधित शेतकऱ्यांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT