Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : अमरावती जिल्ह्यात विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले

Crop Insurance Scheme : ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्याने झालेल्या सोयाबीन नुकसानीपोटी शेतकऱ्यांना अग्रिम देण्यास नकार देणाऱ्या विमा कंपनीचे आक्षेप विभागीय समितीनेही फेटाळून लावले आहेत.

Team Agrowon

Amaravati News : ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्याने झालेल्या सोयाबीन नुकसानीपोटी शेतकऱ्यांना अग्रिम देण्यास नकार देणाऱ्या विमा कंपनीचे आक्षेप विभागीय समितीनेही फेटाळून लावले आहेत. त्यामुळे विमा कंपनीला मोठा झटका बसला आहे. जिल्ह्यातील ४१ महसूल मंडलांत पावसाने खंड दिल्याने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे या संबंधीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावर महसूल, कृषी विभाग व विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात आले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परताव्याच्या २५ टक्के रक्कम अग्रिम देण्याची अधिसूचना काढली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेस आव्हान देत विमा कंपनीने जिल्हास्तरीय समितीकडे आक्षेप दाखल केले. कंपनीने घेतलेले सर्व आक्षेप विभागीय समितीने फेटाळून लावले आहेत. यामध्ये दर्यापूर व अंजनगावसुर्जी तालुक्यात दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू होत असल्याचे कृषी विभागाचा अभिप्राय योग्य ठरविला, तर भातकुली, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, चिखलदरा व धारणी तालुक्यांतील नुकसान पंतप्रधान पीकविमा योजनेच्या शासननिर्णयातील तरतुदीनुसार ग्राह्य ठरविण्यात आले आहे.

पीक सर्वेक्षणासाठी कंपनीला पात्र मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. जे मनुष्यबळ दिले त्यांची शैक्षणिक पात्रता नव्हती.

त्यामुळे शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्वेक्षण करून नुकसान निश्‍चित करण्यात आले, हा कृषी विभागाचा दावा योग्य ठरविला. विमा कंपनीने घेतलेले सर्व आक्षेप विभागीय समितीने नामंजूर केले असून, तातडीने अग्रिम देण्यास बजावले आहे. यापूर्वी जिल्हास्तरीय समितीनेही कंपनीचे आक्षेप फेटाळले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT