Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा अग्रिमवर आता विभागीय आयुक्तांकडे आक्षेप

Crop Insurance Advance Refuse : जिल्ह्यातील ४१ पैकी चार महसूल मंडलांत सोयाबीनचे नुकसान झाले. विमा कंपनीने मात्र चारच महसूल मंडलांचे नुकसान मान्य केले असून उर्वरित मंडळांत अग्रिम देण्यास नकार दिला आहे.

Team Agrowon

Amravati News : जिल्ह्यातील ४१ पैकी चार महसूल मंडलांत सोयाबीनचे नुकसान झाले. विमा कंपनीने मात्र चारच महसूल मंडलांचे नुकसान मान्य केले असून उर्वरित मंडळांत अग्रिम देण्यास नकार दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीचे अपील फेटाळत अग्रिम देण्याचे आदेश दिले असताना आता कंपनीने विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले असून, त्यावर आज (ता. १ नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे.

पावसाने खंड दिल्याने जिल्ह्यातील ४१ महसूल मंडलांतील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विमा परताव्याच्या २५ टक्के अग्रिम देण्याचे व महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विमा कंपनीने मात्र चारच महसूल मंडलांत नुकसान झाल्याचे मान्य करून इतर ठिकाणी आक्षेप घेतले आहेत. जिल्हास्तरीय समितीने हे आक्षेप फेटाळले असताना आता विभागीय समितीकडे अपील करण्यात आले आहे. विभागीय समितीसमोर येत्या एक नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. पनीचे वेळकाढू धोरण स्पष्ट झाले आहे.

समिती काय निर्णय देते, याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून सोयाबीनची काढणी होत असताना अग्रीम मिळण्यास होणारी टाळाटाळ व विलंबामुळे रोष निर्माण झाला आहे.

वेळकाढू धोरण

जिल्हास्तरीय समितीप्रमाणेच विभागीय समितीकडूनही आक्षेप फेटाळल्या जाण्याची शक्यता गृहीत धरूनच विमा कंपनीने कृषी आयुक्त व संचालकांकडे अपील करण्याची तयारी आजच करून ठेवली आहे. या अपिलावरील सुनावणीत तीन महिन्यांहून अधिक काळ जाणार आहे, यावरून विमा कंपनीचे वेळकाढू धोरण स्पष्ट झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT