Shetkari Sangh Election agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh Election : हसन मुश्रीफांच्या उमेदवारावर हरकत, शेतकरी संघाची निवडणूक लागणार?

sandeep Shirguppe

Kolhapur Shetkari Sangh Election : शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत २९२ पैकी २८९ उमदेवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. यशोधन शिंदे यांनी माजी अध्यक्ष युवराज पाटील आणि एम. एम. पाटील यांच्यावर हरकत घेतली. जयसिंग हिर्डेकर हे संघाचे थकबाकीदार असल्याने संघाने त्यांच्या अर्जावर हरकत घेतली, त्यामुळे यावर सुनावणी श्रेण्यात आली. या तीन अर्जावर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, संघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असताना युवराज पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, त्यामुळे संघाची निवडणूक बिनविरोध होण्यास शक्यता धुसर झाली आहे. शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची झुंबड उडाली आहे.

आज सकाळपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हरकती घेण्यात आल्या, यामध्ये शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील यांना भू-विकास बँकेचे थकबाकीदार असल्याने एक पंचवार्षिक निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती, अशी हरकत यशोधन शिंदे यांनी घेतली आहे, तर एम.एम. पाटील हेही थकबाकीदार असल्याने हकरत घेतली.

जयसिंग हिर्डेकर यांनी बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील कासारी खोरे केळी उत्पादक सहकारी संस्थेने घेतलेल्या उत्पादनाची वसुली झाली नसल्याने ते थकबाकीदार असल्याचे सांगितले आहे.

तसेच त्यानंतर त्यांनी याच गावातील जुगाई देवी विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून उमदेवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत काढला जावा, असे संघाच्या वतीने मागणी केली आहे. यावर आज निकाल जाहीर केला जाणार आहे. (ता. २७) पासून १० जानेवारीपर्यंत अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

शेतकरी संघ बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा होती. यामध्ये कोणतेही राजकारण येणार नाही, त्यामुळे अर्ज दाखल करण्यापासून निवडणूक लढवण्यापर्यंत सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, युवराज पाटील यांच्या अर्जावर हरकत घेऊन राजकारण केले जात असल्याचे सांगत कार्यकर्ते संतप्त झाले. मात्र, युवराज पाटील यांनी त्यांच्यावर घेतलेल्या हरकतीवर आपले मत आणि भूमिका वकिलांमार्फत व्यक्त केली आहे, यावर उद्या निकाल दिला जाणार आहे.

संघाच्या निवडणुकीत आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक रिंगणात उतरणार, हे येणान्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT