Shetkari Sangh Election : शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी ७८ अर्ज, संघ वाचवण्यासाठी उमेदवारीची अनेकांची मागणी

Shetkari Sangh Election : एका दिवसांत २८ इच्छुकांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले. तिसऱ्या दिवसा अखेर ७१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले आहेत.
Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur Shetkari Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघाची निवडणूक प्रक्रीया सुरू आहे. मोडकळीस आलेल्या शेतकरी संघाला वाचवण्याच्या हेतूने जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी यामध्ये भाग घेत ही निवडणूक अंत्यत चुरशीची होण्याची शक्यता बोलली जात आहे. दरम्यान सघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काल एका दिवसांत एकूण २८ इच्छुकांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले. तिसऱ्या दिवसा अखेर ७१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवार (ता. २२) पर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. याबाबतची माहिती नीलकंठ करे यांनी दिली.

शेतकरी संघासाठी आज व्यक्ती सभासद गटासाठी ९ उमदेवारांनी ११ अर्ज दाखल केले आहेत. व्यक्ती सभासद गटातून शिवाजी पाटील, संजय पाटील, दत्तात्रय खराडे, सखाराम पाटील, सौताराम खाडे, अभिजित पाटील, अविनाश पाटील, एकनाथ चौगले व कृष्णात फराकटे यांनी उमदेवारी अर्ज दाखल केले आहेत. संस्था सभासद गटातून रामचंद्र खराडे, दिनकर वाडकर, अमर भोसले, अरुण शिंत्रे, जयकुमार मुनोळी, सुनील चौगले, अशोक चौगले, शिवाजी कवठेकर, संग्रामसिंह पाटील आणि कृष्णात फराकटे यांनी उमदेवारी अर्ज दाखल केले आहेत.

संस्था सभासद गटासाठी १० उमेदवारांनी १० अर्ज, महिला गटासाठी ३ उमेदवारांनी ३ अर्ज, अनुसूचित जाती गटासाठी ३ उमदेवारांनी ३ अर्ज, इतर मागासवर्गीय गटासाठी एका उमेदवाराने १ अर्ज तसेच भटक्या विमुक्त जमाती गटासाठी २८ उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी ७१ उमदेवारांनी ७८ अर्ज दाखल केले आहेत.

अनुसूचित जाती जमातीसाठी संजय कांबळे, रतन कांबळे, सुभाष देसाई, इतर मागासवर्गीयमधून अशोक चौगले, महिला सभासद गटासाठी जान्हवी रावराणे, प्रेमला पाटील आणि अनुजा पाटील, विमुक्त भटक्या जमातीसाठी भैरवनाथ डवरी व मोहन डवरी यांनी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे संघाच्या १९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत पॅनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी चढाओढ होणार आहे. जिल्हा उपनिबंधक करे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर कार्यालयीन अधीक्षक मिलिंद ओतारी, तसेच प्रेरणा शिवदास सहायक म्हणून काम पाहत आहेत.

Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh Kolhapur : कोल्हापूर शेतकरी संघात ७२ लाखांचा घोटाळा, व्यवस्थापकावर गुन्हा

शेतकरी सहकारी संघाची आर्थिक स्थिती बिकट करणाऱ्या आजी-माजी संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांना होऊ घातलेल्या निवडणुकीत संचालक म्हणून स्थान देऊ नये. संघातील अपहारही उघडकीस आला आहे. गेली २० वर्षे शेतकरी संघाची आर्थिक घडी विस्कटली आहे, वेळेवर पगार होत नाहीत, कोटीवर कर्ज आहे, अनेक पैसे देणे घेण्याच्या कोर्टात केसेस सुरू आहेत.

अनेक शाखांमध्ये आर्थिक घोटाळ्याची प्रकरणे समोर आली आहेत. यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी या संचालकांची होती. संघाची आजची अवस्था आजी-माजी संचालकांमुळे आहे. यामध्ये काही कर्मचारी आणि अधिकारीही सामील आहेत.

त्यामुळे संघ डबघाईला आणणाऱ्या संचालकांना पुन्हा संधी देऊन नये, यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील व खासदार संजय मंडलिक या सर्व नेत्यांनी संघाच्या हिताचे काम करणाऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी चंद्रकांत खोंद्रे, संदेश कचरे, अमर जाधव यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com