Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : सुपारी बागायतदार पावसामुळे धास्‍तावले

Rain Update : रविवारी रात्री आठच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्‍या पावसाने बागायतदारांच्या चक्रीवादळाच्या आठवणी जाग्या झाल्या. सुपारी बागायतदारांनी पावसाची धास्‍ती घेतली असून असाच पाऊस सुरू राहिल्‍यास पिकावर रोगराई निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Team Agrowon

Raigad News : खरीप हंगामातील भातपिके बहरली असून हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातुर आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्‍या पावसाने बागायतदारांच्या चक्रीवादळाच्या आठवणी जाग्या झाल्या. सुपारी बागायतदारांनी पावसाची धास्‍ती घेतली असून असाच पाऊस सुरू राहिल्‍यास पिकावर रोगराई निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पावसामुळे चौल नाका, आग्राव रस्ता, मुरूड तालुक्यातील साळावगाव-चोरडा या राज्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात सलग पाच दिवस वादळी वाऱ्यासहित मुसळधार पाऊस पडत असून शनिवारी सायंकाळी गोवे गावातील आठ घरांवर वीज पडून घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेत एका महिलेसहित १३ वर्षीय मुलगा किरकोळ जखमी झाला, तसेच घरातील विद्युत उपकरणे नादुरुस्‍त झाल्‍याने मोठे नुकसान झाले आहे.

कोलाड भागात शनिवार (ता. १२) सायंकाळी दीड-दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गोवे गावातील विजय जवके, विश्वास निकम, मारुती निकम, गणेश दहिंबेकर, यशवंत सुतार, दिलीप आंबेकर, अविनाश आंबेकर, कमलाकर सुर्वे यांच्या घरांवर अचानक वीज पडली. त्यामुळे त्‍यांच्या घरातील विद्युत उपकरणे, विद्युत बोर्ड व वायरिंग पूर्णतः जळली. टीव्ही, फ्रिज अन्य वस्‍तू नादुरुस्त झाल्‍या.

वादळी पावसामुळे विजय जवके यांच्या घरातील काही भागातील पत्रे तुटले, तर दिलीप आंबेकर यांच्या घरावर वीज पडल्याने महिला व एक मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते. अवघ्‍या काही महिन्यांपूर्वी भरलेले खड्डे पुन्हा उखडल्‍याने कामाच्या दर्जावरून नागरिक बांधकाम विभागावर संताप व्यक्‍त करीत आहेत.

पाली येथे मुसळधार पावसामुळे अवघ्या तासाभरात रविवारी (ता. १३) सायंकाळी अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या व सुधागड तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बस स्थानक पूर्णपणे जलमय झाले. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेकांनी व्हॉट्सअप ग्रुप व समाजमाध्यमांवर पालिका प्रशासनाविरोधात संतप्त व्यक्‍त करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Deforestation In India : इंग्रज, वन विभाग आणि जंगलांचा ऱ्हास

Healthy Tiffin: व्यस्त दिनचर्येतही आरोग्यदायी टिफिनचा सोपा पर्याय

Namo Drone Didi Scheme : नमो ड्रोन दीदी योजनेतून महाराष्ट्रातील ४७ गटांना अनुदान

Corporate Finance Capitalisms : सत्ताधारी वर्गाचे राजकीय अर्थकारण

Monsoon Crisis Maharashtra : पूर : असमन्वय अनियंत्रणाचा!

SCROLL FOR NEXT