Paddy Crop : दमदार पावसामुळे भात पिके निसवण्याच्या अवस्थेत

Paddy Farming : यंदा सुरुवातीपासून झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भात पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी भात पिके वाढीच्या अवस्थेत असून लवकर लागवड झालेली भात पिके निसवण्याच्या अवस्थेत आहेत.
Paddy Crop
Paddy CropAgrowon
Published on
Updated on

Pune News : यंदा सुरुवातीपासून झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भात पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी भात पिके वाढीच्या अवस्थेत असून लवकर लागवड झालेली भात पिके निसवण्याच्या अवस्थेत आहेत. आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे यंदा अपेक्षित उत्पन्न हातात येण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे.

जूनच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात रोपे टाकण्यास सुरुवात केली होती. जवळपास २० ते २५ दिवसांत भात रोपे लागवडीस आली. त्यामुळे शेतकरी लवकरच चांगला पाऊस होईल म्हणून या आशेने शेतीकामांनी वेग घेतला होता. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे भात लागवडीला चांगलाच वेग आला होता.

Paddy Crop
Paddy Crop : रायगड जिल्ह्यातील भातपिकावर संक्रांत

यंदा मजुरांची टंचाई असताना इर्जिक पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडी केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने भात लागवडी केल्या आहेत. जुलै अखेरीस जवळपास सर्वच भागात भात लागवडी उरकल्या होत्या. सात ते आठ तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच अवलंबून आहेत.

Paddy Crop
Paddy Crop Damage : बहरलेल्‍या भातपिकाचे पावसामुळे नुकसान

जिल्ह्याच्या भात पट्यात सरासरीच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ६० हजार ८५७ हेक्टर म्हणजेच १०२ टक्के भाताच्या पुर्नलागवडी झाल्या होत्या. परंतु ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे भात पिके काही प्रमाणात अडचणीत आली होती. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होती. परंतु सप्टेंबरच्या अखेरीस पडलेल्या दमदार पावसामुळे भात पिकांना चांगलाच आधार मिळाला. सध्या बहुतांश भागात भात पिके निसवण्याच्या स्थितीत आहेत.

भाताच्या विविध वाणांच्या लागवडीवर भर

दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी आंबेमोहोर, साळ, दोडकी, कोलम, इंद्रायणी या पारंपारिक भात बियाणांच्या लागवडी करत आहे. त्यासोबत कोकणी, पार्वती, फुले समृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी, व तृप्ती अशा संकरित विकसित भात बियाणांच्या वाणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम खोऱ्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोलम आणि इंद्रायणी या भाताच्या वाणांची मोठ्या क्षेत्रावर लागवड केली आहे. मावळसह भोर, मुळशी तालुक्यांत पारंपरिक चारसुत्री, अभिनव पट्टा पद्धत, एसआरटी व इतर पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी भात लागवड केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com