Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seed : बोगस बियाणेप्रकरणी तपासासाठी आता ‘एसआयटी’

Bogus Seed Production : बनावट बियाण्यांचा कारखाना पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वात पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणाशी निगडीत पाळेमुळे खोदण्यासाठी आता एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टिम) ची स्थापना करण्यात आली आहे.

Team Agrowon

Wardha Seed News : बनावट बियाण्यांचा कारखाना पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वात पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणाशी निगडीत पाळेमुळे खोदण्यासाठी आता एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टिम) ची स्थापना करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे बोगस बियाण्यांसदर्भातील हे रॅकेट गेल्या तीन ते चार वर्षांपासून ॲक्टिव्ह असल्याची चर्चा असून त्याला कृषी विभागाचे पाठबळ होते का? या दृष्टीनेही तपास केला जाणार आहे.

पोलिसांनी वर्धा शहरालगतच्या मसळा येथे छापेमारी करीत बोगस बियाण्यांचा कारखाना उद्ध्वस्त केला. १ कोटी ५१ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला. सोबतच दहा जणांना अटक केली.

पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वात ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आणि त्याचे राज्यभरात कौतुक झाले. विशेष म्हणजे बोगस बियाणे विकणारे हे रॅकेट गेल्या तीन ते चार वर्षांपासून सक्रिय असताना त्याच्याविषयी कृषी विभागाला कल्पना नसणे हे अनाकलनीय असल्याची चर्चा आहे.

त्यासोबतच पोलिसांनी कारवाई केलेले हे स्थळ कृषी विभागाच्या कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या छत्रछायेत किंवा काही कृषी अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच हे रॅकेट सक्रिय होते, असा आरोप होत आहे.

त्यासोबतच या रॅकेशी संबंधित सर्व सूत्रधारांचा शोध घेण्यासोबत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी विशेष तपास पथकाचे गठण केले आहे. हे पथक कृषी विभागातील संबंधितांचीही चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. या पथकात १५ जणांचा समावेश असून दर २४ तासाला केलेल्या तपासाची माहिती पोलिस अधीक्षकांना द्यावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement: ‘सीसीआय’तर्फे परभणी, मानवतमध्ये कापूस खरेदी सुरू

Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी कायम

Agriculture MSP: शनिवारपासून सोयाबीन, मूग, उडीद हमीभावाने खरेदी सुरू!

Weather Update: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; उत्तरेकडील जिल्ह्यांत तापमान घसरले

Market Update: सोयाबीनचा दर टिकून, मुगावर दबाव कायम

SCROLL FOR NEXT