Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना आता ४० हजार रुपयांपर्यंत कर्ज

Maharashtra Government Initiative: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींना ४० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली. यामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Nanded News: विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला ‘लाडकी बहीण’ योजना फायदेशीर ठरली. महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जातात. आता योजनेतील ‘लाडक्या बहिणीं’ना स्वावलंबी बनण्यासाठी ४० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार विचारविनिमय करत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता. ११) आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा दीड हजार रुपये शासनाच्या वतीने दिले जातात.

यासाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात. बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आणि योजना बंद होणार नाही. उलट आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. काही बँका पुढे आल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बँकेसमवेत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या आहेत. दरमहा दीड हजार रुपये भगिनींना दिले जातात. त्याऐवजी उद्योग, व्यवसायासाठी ४० हजार रुपयांपर्यंत भांडवल उपलब्ध करून द्यायचे व कर्जाचा हप्ता योजनेतून वळता केला जाईल. ५० हजारांचे भांडवल झाले तर, बहिणी स्वत:चा व्यवसाय करू शकतील, कुटुंब उभे करू शकतात. असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT