Sand Mining Agrowon
ॲग्रो विशेष

Sand Committee : वाळूसाठी आता पुन्हा समितीराज

Government Decision Update : शासनामार्फत स्वस्तात वाळू पुरवठा करण्यासाठी पुन्हा शासन निर्णय झाला असून, पुन्हा समित्या स्थापन केल्या जात आहेत.

Team Agrowon

Solapur News : शासनामार्फत स्वस्तात वाळू पुरवठा करण्यासाठी पुन्हा शासन निर्णय झाला असून, पुन्हा समित्या स्थापन केल्या जात आहेत. यासाठी राज्यशासनाने १६ फेब्रुवारी रोजी सुधारित शासन निर्णय जाहीर केला असून, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, याच समिती सदस्यांच्या आशीर्वादाने जिल्हाभर बेकायदा वाळू उपसा सुरू असून कारवाईचा केवळ फार्स केला जात आहे. ठिकठिकाणच्या वाळूउपशामुळे पर्यावरणाबरोबरच ऐतिहासिक वास्तू, मंदिरे धोक्यात आली आहेत.

राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने १६ फेब्रुवारी रोजी सुधारित आदेश जाहीर केला असून, त्यानुसार जिल्हा स्तराबरोबरच तालुकास्तरावरही तांत्रिक उपसमिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

तालुकास्तरीय उपसमितीचे अध्यक्ष हे तहसीलदार असून, यामध्ये जलसंपदा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूविज्ञान खनिकर्म तसेच भूजल सर्व्हेक्षण याबरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. आतापर्यंत स्वस्तात वाळू उपलब्ध करून देणे व अवैध वाळू उपसा रोखण्याची जबाबदारी याच अधिकाऱ्यांवर होती. मात्र, त्यांनी ती त्यांनी पार न पाडल्याने बेकायदा वाळू उपशाला ऊत आला आहे.

धोरण गुंडाळून अवैध विक्री

यापूर्वीदेखील शासनाने वाळू स्वस्तातील वाळू विक्रीसाठी ॲप तयार केले होते. शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येत होती. यासाठी पाच वाळूघाटाचे लिलावदेखील करण्यात आले होते. मात्र वाळू माफिया आणि शासकीय अधिकारी यांनी स्वस्तात वाळूचा पुरवठा बंद पाडून बेसुमार बेकायदा वाळूउपसा केला आहे.

एकट्या देगाव (ता. मोहोळ) येथे सुमारे दोन हजार ब्रास वाळूउपसा करून फक्त ८० ब्रास वाळूचा उपसा झाल्याचा पंचनामा केला असून, मुख्य माफिया व्यतिरिक्त एक दोन जणांवर किरकोळ कारवाई केली आहे. वाळू वाहतुकदारांकडून ऐतिहासिक वेस पडूनही अज्ञात वाहनधारकांवर गुन्हा दाखल करून फक्त १५ हजारांचे नुकसान दाखवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT