Sand Mining
Sand MiningAgrowon

Sand Auction : वाळू लिलावाकडे ठेकेदारांची पाठ

Sand Mining Update : नाशिक जिल्ह्यातील घाटांवर वाळूचे प्रमाण कमी असणे, स्थानिकांचा विरोध तसेच वाळूचा दर्जा कमी असल्याने ठेकेदार या वाळू लिलावाकडे पाठ फिरवत असल्याचे सांगितले जाते.
Published on

Nashik News : नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या पाच तालुक्यांतील २० वाळूघाटांसाठी जिल्हा खनिकर्म विभागाला तिसऱ्यांदा फेरनिविदा प्रसिद्ध करावी लागली आहे. यात सहभागी होण्यासाठी मंगळवार (ता. १३) पर्यंत मुदत आहे.

जिल्ह्यातील घाटांवर वाळूचे प्रमाण कमी असणे, स्थानिकांचा विरोध तसेच वाळूचा दर्जा कमी असल्याने ठेकेदार या वाळू लिलावाकडे पाठ फिरवत असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक निविदेवेळी लिलावाची रक्कम २५ टक्के कमी करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे.

राज्य सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपये ब्रास या दराने वाळू देण्याचा, तसेच घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे.

यात लाभार्थ्यांना केवळ वाहतूक खर्च करावा लागेल. यामुळे या नवीन वाळू धोरणाचे राज्यात स्वागत झाले, नवीन वाळू धोरण राज्यात १ मे २०२३ पासून लागू करायचे होते; पण निविदा प्रक्रिया पूर्ण न होऊ शकल्याने त्याचा मुहूर्त टळला, त्यासाठी नाशिक जिल्ह्यात १३ वाळू सम्राटांना परवानग्या दिल्या होत्या.

Sand Mining
Sand Auction: शासन उपलब्ध करून देणार ६०० रुपयांत एक ब्रास वाळू

मालेगाव तालुक्यात पाच, कळवण, देवळा व बागलाग या तीन तालुक्यांत आठ घाट व एकूण सहा डेपो निश्‍चित करण्यात आले होते. त्यातून १० हजार टन वाळूचा उपसा होणार होता. पण निविदाप्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही.

यामुळे या धोरणाची जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नाही.जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी केवळ निफाड तालुक्यातील चेहेडी येथे वाळू डेपो सुरू झाला.

Sand Mining
Sand Excavation : गिरणा नदीत बेसुमार वाळूउपसा सुरूच

मागील हंगामात निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा खनिकर्म विभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये फेरनिविदा प्रसिद्ध केली होती. या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने फेरनिविदा राबविण्याचा निर्णय आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील वाळूची प्रतवारी पसरणे, वाळूचे प्रमाण कमी तसेच प्रस्तावित वाळूघाटांना स्थानिकांचा विरोध आहे. यामुळे ठेकेदार या लिलाव प्रक्रियेपासून दूर राहत असल्याचे सांगितले जाते. यामुळे शासनाच्या तिजोरीलाही फटका बसत आहे.

...या वाळूघाटांचा लिलाव

बागलाण धांद्री, नामपूर, द्याने

कळवण देसगाव, नाकोडे, कळवण बुद्रुक, वरखेडा, पाळे खुर्द

देवळा ठेंगोडा बंधारा

नांदगाव न्यायडोंगरी

मालेगाव पाटणे, चिंचावड, आघार खुर्द, येसगाव बुद्रुक, सवंदगाव, सावतावाडी, वडनेर, वळवाडी, अजंग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com