Ginger Procurement Notice Agrowon
ॲग्रो विशेष

Koregaon APMC : कोरेगाव बाजार समितीकडून सरसकट खरेदीसाठी व्यापाऱ्यांना नोटिसा

Notices to Traders : आले सरसकट खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटिसाही देण्यात आल्या.

Team Agrowon

Satara News : कोरेगाव तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या फिरत्या पथकाने शनिवारी (ता.२०) रात्री विविध ठिकाणी अचानक छापे टाकून आले खरेदीदार व्यापारी जुना-नवा असे सरसकट आले खरेदी करतात की नाही, याबाबत तपासणी केली. आले सरसकट खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटिसाही देण्यात आल्या.

कोरेगाव बाजार समितीत आठ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीपूर्वी ज्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे आले सौदे झालेले होते, त्यांना १८ जुलैपर्यंत काढणी करून व्यवहार पूर्ण करण्यासाठी विहित वेळ वाढवून दिलेली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी नवा-जुना असा भेद न करता सरसकट आले खरेदी करावे, असे ठरले होते.

त्यानुसार कार्यवाही होत आहे का, हे तपासण्यासाठी बाजार समितीने एक भरारी पथक स्थापन करून छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री या पथकाने खेड-नांदगिरी, सातारारोड, पाडळी स्टेशन येथे नदीवर सुरू असलेल्या ‘आले धुनी आणि भरणी’ करणाऱ्या व्यापारी वाहनांसह व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या आले शेतमालाची बारकाईने पाहणी केली.

त्यामध्ये बैठकीत ठरल्यानुसार व बाजार समितीने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आले खरेदीदार व्यापारी जुना- नवा असा सरसकट माल खरेदी करतात किंवा कसे, याबाबत तपासणी करण्यात आली. यावेळी कोरेगाव परिसरामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे आल्याची खांदणी करून वाहतुकीस विलंब होत आहे, असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

तरीही आम्ही कायमस्वरूपी नवा-जुना असा सरसकट शेतमाल खरेदी करून पुढे इतर मार्केटला विक्रीसाठी पाठवू, अशी ग्वाही व्यापारी वर्गाकडून देण्यात आली. या वेळी फिरत्या भरारी पथकाने बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील संदीप विठ्ठल कदम (खेड), दत्तात्रय कदम (चंचळी), संकेत चतुर (नांदगिरी), सुबोध फाळके (पाडळी) या व्यापाऱ्यांना सरसकट खरेदीसाठी लेखी नोटिसा देण्यात आल्या.

या पथकात बाजार समितीचे सभापती ॲड. पांडुरंग भोसले, शेतकरी प्रतिनिधी दिनेश बर्गे, अमर बर्गे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, कोरेगाव बाजार समितीचे सचिव संताजी यादव, बाजार समितीच्या वाठार स्टेशन शाखेचे शाखाप्रमुख जयसिंग जगदाळे यांचा समावेश होता. तालुक्यात आल्याच्या काढणीत कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक झाल्यास कोरेगाव बाजार समिती संबंधित आले खरेदीदार व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करेल, असा इशाराही बाजार समितीच्या वतीने सर्व व्यापारी वर्गाला देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT