Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : गाळप हंगाम सुरू करूनही माहिती दिली नाही; सात कारखान्यांना नोटिसा

Sugarcane Crushing : उसाचा गाळप हंगाम सुरू करूनही त्याची माहिती साखर सहसंचालकांना न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सुदर्शन सुतार

Solapur News : उसाचा गाळप हंगाम सुरू करूनही त्याची माहिती साखर सहसंचालकांना न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. माजी सहकारमंत्री आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि भाजपचेच हर्षवर्धन पाटील या दोन माजी सहकारमंत्र्यांच्या कारखान्याचा त्यात समावेश आहेच.

ऊस गाळपाची सुरुवात केल्यानंतर त्याबाबतची माहिती साखर सहसंचालकांना देणे कारखाना प्रशासनाला बंधनकारक असते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांनी त्याबाबतची माहिती दिली नसल्याने या नोटिशी त्यांना बजावण्यात आल्या आहेत. ऊस गाळप हंगामाची सुरुवात झाल्यानंतर माहिती देण्यासाठी या कारखान्यांना वारंवार सूचना करण्यात आलेली आहे.

त्यानंतरही गाळप हंगाम सुरू केल्याचे या कारखान्यांनी साखर सहसंचालकांना सांगितलेले नाही. त्यामुळे साखर सहसंचालक कार्यालयाकडून नोटीस पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली. विशेष म्हणजे त्यात दोन माजी सहकारमंत्र्यांच्या कारखान्यांचा समावेश असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांचाही समावेश आहे. जवळपास २० हून अधिक कारखाने सध्या सुरु आहेत.

त्यापैकी उत्तर सोलापूर तालुक्यातील आमदार सुभाष देशमुख यांच्या संबंधित बीबी दारफळ येथील लोकमंगल, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील लोकमंगल, लोहारा येथील लोकमंगल (माऊली), तसेच पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे अध्यक्ष असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील यांचा सांगोला तालुक्यातील सांगोला सहकारी साखर कारखाना, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर या त्या सात कारखान्यांचा नोटीसा बजावलेल्यांमध्ये समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT