Old Pension Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Old Pension Scheme : जुन्या पेन्शनसाठीच्या आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांना नोटिसा

नोटिसा बजावण्यास कर्मचारीच उपलब्ध नसल्याने, संबंधितांना व्हॉट्‌सॲपद्वारे नोटिसा पाठविण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी, संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.

Team Agrowon

Nagar News : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांनी न्यू आर्ट्‌स महाविद्यालयाजवळ आंदोलन (Protest) केले.

जिल्हा परिषद कार्यालयावर आंदोलन करीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून निवेदन दिले. प्रशासनाने शुक्रवारी (ता. १७) सुमारे १७ हजार संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या सहीने, तर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शिक्षक, ग्रामसेवक, कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या सहीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

२४ तासांत खुलासा करून कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोटिसा बजावण्यास कर्मचारीच उपलब्ध नसल्याने, संबंधितांना व्हॉट्‌सॲपद्वारे नोटिसा पाठविण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी, संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.

...अशी बजावली नोटीस

महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमातील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही निदर्शनांमध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येऊन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. यापूर्वी नोटीस देऊनही आपण संपात सहभागी झाला आहात.

तरी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियमातील तरतुदीनुसार भंग झाल्याने ‘काम नाही वेतन नाही’ या धोरणानुसार वेतन कपातीची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत २४ तासांत खुलासा करावा.

मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास आपले काही एक म्हणणे नाही, असे समजून आपणाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीमध्ये म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dr. Homi Cherian: सेंद्रिय मसाला पीक उत्पादनाला प्रोत्साहन

Fake Success Story: फसव्या यशकथांचा सापळा

Tur Crop Disease: तुरीवरील वांझ रोगास कारणीभूत कोळीचे नियंत्रण

Vermicompost Production: गांडूळ खत निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन

Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

SCROLL FOR NEXT