Old pension scheme : ‘कृषी’तील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किंचित वाढली

पहिल्या दिवशी मराठवाड्यातून संपात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ४११ होती ती गुरुवारी तिसऱ्या दिवशी संप सुरू असताना सुमारे २ हजार २०५ वर आली होती.
Old Pension Scheme State Employee Strike
Old Pension Scheme State Employee StrikeAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे कर्मचारी (Agriculture office worker) संपावर असली, तरी पहिल्या दिवसाच्या तुलनेत गुरुवारी (ता. १६) कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांची संख्या किंचित वाढल्याचे कृषी विभागाच्या उपस्थिती अहवालावरून दिसते आहे.

पहिल्या दिवशी मराठवाड्यातून संपात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ४११ होती ती गुरुवारी तिसऱ्या दिवशी संप सुरू असताना सुमारे २ हजार २०५ वर आली होती.

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या संपाचा गुरुवारी तिसरा दिवस होता. कृषी विभागाचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत एकूण १५०३ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.

मंगळवारी (ता. १४) संपाच्या पहिल्या दिवशी या तीनही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांपैकी २० कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर होते. ५४५ कर्मचारी कार्यालयात उपस्थित व ९३८ कर्मचारी संपात सहभागी झाले होते.

Old Pension Scheme State Employee Strike
Old Pension Scheme : चार हजार कर्मचारी कर्तव्यावर

गुरुवारी संपाच्या तिसऱ्या दिवशी, तीनही जिल्ह्यांतील ३३ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर, तर ७५७ कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी झाले होते. याशिवाय कार्यालयात उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाहिल्या दिवसाच्या तुलनेत किंचित वाढून ती ७१३ वर पोहोचली होती.

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये २३५५ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी संपाच्या पहिल्या दिवशी ५५ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर होते तर १४७३ कर्मचारी संपात सहभागी झाले होते.

शिवाय ८२७ कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. गुरुवारी लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यात कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी ६६ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर होते.

जुनी पेन्शन मागणीच्या संपात चौथ्या दिवशी शुक्रवारी (ता. १७) छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील ७५० कर्मचारी संपात सहभागी झाले होते.

दुसरीकडे ३० कर्मचारी रजेवर तर ७२३ कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. गत दोन दिवसापासून कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू वाढते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com