Maharashtra Assembly Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Election Expenditure : खर्च तपासणीसाठी गैरहजर राहणाऱ्या १२ उमेदवारांना नोटिसा

Election Commission Notice : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने जालना तहसील कार्यालयात बुधवारी (ता. १३) जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी पारपडली.

Team Agrowon

Jalana News : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने जालना तहसील कार्यालयात बुधवारी (ता. १३) जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी पारपडली.

या द्वितीय खर्च तपासणीसाठी गैरहजर असलेल्या १२ उमेदवारांना नोटिसा देखील देण्यात आल्या, असल्याचे खर्च निवडणूक निरीक्षक देव प्रकाश बमनावत यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचाराच्या कालावधीत किमान ३ वेळा प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करण्यात येते.

उमेदवारांना व्यक्तिशः किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे. परतूर, घनसावंगी, भोकरदन, बदनापूर आणि जालना विधानसभा मतदार संघांतील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात आली.

विधानसभा निवडणूक प्रक्रियेमधील प्रत्येक तपासणीनंतर उमेदवाराच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीच्या तारखेपर्यंत स्कॅन करण्यात येऊन निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे.

विधानसभेच्या प्रत्येक उमेदवारास ज्या तारखेस तो नामनिर्देशित झाला होता ती तारीख व निवडणुकीच्या निकाल घोषित झाल्याची तारीख या दोन्ही तारखांसह या दरम्यान त्याने केलेल्या किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेल्या खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा (हिशेब) ठेवणे अनिवार्य आहे. उक्त मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च करणे किंवा प्राधिकृत करणे हे लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२३ (६) च्या संदर्भात भ्रष्ट आचारण आहे.

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील द्वितीय निवडणूक खर्च लेख्यांची तपासणीच्या वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी (खर्च) राजु सोळुंके यांच्यासह सहाय्यक खर्च निरीक्षक व लेखांकन चमुमधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उमेदवारांची तिसरी आणि शेवटीच खर्च तपासणी रविवार, दि. १७ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार असल्याचे निवडणूक निरीक्षक श्री. बमनावत यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT