Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बीची अपेक्षित पेरणी नाहीच

Rabi Season : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीनही जिल्ह्यांत २१ डिसेंबर अखेरपर्यंत रब्बीची अपेक्षित पेरणी झालीच नव्हती.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीनही जिल्ह्यांत २१ डिसेंबर अखेरपर्यंत रब्बीची अपेक्षित पेरणी झालीच नव्हती. तीनही जिल्ह्यांत सर्वसाधारण ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख ३९ हजार ४३४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ७२.७८ टक्के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली होती.

यंदा मराठवाड्यात पावसाची अवकृपाच राहिली. अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यातही पावसाचे प्रदीर्घ खंड पाहायला मिळाले. त्याचा थेट परिणाम जमिनीच्या ओलीवर होऊन रब्बी पेरणी रखडत सुरू झाली. नोव्हेंबरअखेर व डिसेंबरच्या सुरुवातीला आलेल्या अवेळी पावसानंतर थोडी बहुत पेरणीला गती मिळाली. परंतु तीनही जिल्ह्यांच्या कृषी विभागाचा पेरणी अहवाल पाहता, सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बीची अपेक्षित पेरणी झालीच नाही.

दरवर्षी हरभऱ्याचे पेरणी झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन असते. यंदा तेही ८८ टक्क्यांवर अडकून पडले आहे. रब्बी ज्वारीची ही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७५ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, गव्हाची तर अपेक्षित क्षेत्राच्या ५० टक्केही पेरणी झाली नसल्याची स्थिती आहे.

ज्वारी क्षेत्र कमीच

तीनही जिल्हे मिळून यंदाच्या रब्बी हंगामात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३ लाख २ हजार १३८ हेक्टर इतके होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात दोन लाख २८ हजार ९६७ हेक्टरवरच म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७५.७८ टक्के क्षेत्रावरच रब्बी ज्वारीची पेरणी झाली.

पेरणी झालेल्या या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरमधील २५ हजार ९२६ हेक्टर, जालन्यातील ५७ हजार ६८६ हेक्टर, तर बीडमधील १ लाख ४५ हजार ३५५ हेक्टर रब्बी ज्वारी क्षेत्राचा समावेश आहे. ज्वारीच्या दरातील तेजी आणि घटते क्षेत्र या पिकातील संधी अधोरेखित करीत आहेत.

गव्हाची पेरणीही निम्मीच

तीनही जिल्ह्यांत गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५७ हजार ११६ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ७० हजार ९०९ हेक्टर म्हणजे केवळ ४५.१३ टक्के क्षेत्रावरच गव्हाची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरमधील ३४ हजार १७४ हेक्टर, जालन्यातील १३ हजार ७३९ हेक्टर, तर बीडमधील २२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

हरभऱ्याचीही अपेक्षित पेरणी नाही

तीनही जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ३६ हजार ८४१ हेक्टर इतके आहे .त्या तुलनेत प्रत्यक्षात २ लाख १० हजार ५६० हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८८.९० टक्के क्षेत्रावरच हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरमधील ४० हजार ८०४ हेक्टर, जालन्यातील ३४ हजार ७४१ हेक्टर, तर बीडमधील १ लाख ३५ हजार १५ हेक्टर हरभरा क्षेत्राचा समावेश आहे. त्यातही हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

जिल्हानिहाय रब्बीचे सरासरी व प्रत्यक्ष पेरणीक्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी प्रत्यक्ष टक्केवारी

छ.संभाजीनगर १९ हजार ९३५ १ लाख २१ हजार ९९५ ६३.८९

जालना २ लाख १७ हजार ८९२ १ लाख ८ हजार ९८० ५०.०२

बीड ३ लाख ३२ हजार ३५३ ३ लाख ८ हजार ४५९ ९२.८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT