Rabi Sowing : नगर जिल्ह्यात रब्बीची ७१ टक्के पेरणी

Rabi Season : नगर जिल्ह्यात रब्बीत ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातील आतापर्यंत ३ लाख २९ हेक्टरवर २७७ पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यात अजूनही रब्बी हंगामातील पेरण्याची स्थिती कमीच आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात ७१ टक्के म्हणजे सरासरीच्या ३ लाख २९ हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पुरेसे पाणी नसल्याने यंदा गव्हाची पेरणीही फारसी पुढे जाईना. गव्हाची ९० टक्के पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यात रब्बीत ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातील आतापर्यंत ३ लाख २९ हेक्टरवर २७७ पेरणी झाली आहे. यंदा खरिपातही पुरेसा पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झाले. दरवर्षी परतीचा पाऊस असल्याने दिवाळीनंतर पेरण्याचे क्षेत्र वाढत असते. यंदा मात्र परतीचा पाऊस झाला नाही.

Rabi Sowing
Rabi Sowing : पुणे विभागात ६८ टक्के पेरण्या

त्यामुळे दिवाळीनंतर पेरण्याला फार वेग आला नाही. यंदा अनेक भागांत पुरेसे पाणी नसल्याने गहू, हरभरा, कांदा या पिकांचे क्षेत्र फारसे वाढताना दिसत नाही. आतापर्यंत गव्हाची ९०.५४ टक्के, हरभऱ्याची १५७ टक्के, ज्वारीची सरासरीच्या ६४ टक्के पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : अकोल्यात रब्बीची १०० टक्के पेरणी आटोपली

मका, हरभरा पेरणीने सरासरी ओलांडली असली तरी मकाचे सरासरी क्षेत्रच कमी आहे. यंदा पावसाचा कांदा लागवडीवरही परिणाम दिसत होता. मात्र अवकाळी पावसाने ज्या भागात पाणी उपलब्ध झाले तेथे कांदा लागवड सुरू आहे. कृषी विभागाकडून मात्र कांदा लागवडीची नोंद घेतली जात नाही. यंदा अजूनही पेरणी क्षेत्र कमी असल्याने आता त्यात फार क्षेत्रवाढ होईल अशी शक्यता नाही.

पेरणीक्षेत्र (हेक्टर)

ज्वारीची १ लाख ७३ हजार ६५२

गहू ७८ हजार २३०

मका २७ हजार ९५८,

हरभरा १ लाख ३९ हजार ३४४

सूर्यफूल २०

करडई १२७

जवस ३०

तीळ ४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com