Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीचीपेरणी अंतिम टप्प्यात

Rabi Season : यंदा पावसाची सरासरी टक्केवारी गाठता आला नाही. त्यातच परतीचा पावसाने दडी मारली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. गहू आणि हरभरा पेरणीला गती आली असून, यंदाच्या हंगामात १ लाख ५० हजार ५८५ हेक्टरवर पेरा झाला आहे. गतवर्षी रब्बीचा १ लाख ८५ हजार २५१ हेक्टरवर झाली असून, यंदाच्या रब्बी हंगामात १० टक्क्यांनी पेरा घटेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात गतवर्षी रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९४ हेक्टर असून, १ लाख ८५ हजार २५१ हेक्टरवर म्हणजे ९७ टक्के पेरणी झाली होती. यंदा पावसाची सरासरी टक्केवारी गाठता आला नाही. त्यातच परतीचा पावसाने दडी मारली आहे. त्याचा फटका रब्बी हंगामातील पेरणीवर झाला आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : खानदेशात रब्बीची ७५ टक्के पेरणी

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९६१ हेक्टर इतके आहे. त्यापैकी सर्वाधिक सरासरी क्षेत्र १ लाख २६ हजार ०६६ ज्वारीचे आहे. ज्वारीची १ लाख ५ हजार ७७४ हेक्टर वर पेरा झाला आहे. तर गहू, मका, हरभरा, कडधान्ये गळीत धान्यांची ४४ हजार ८११ हेक्टरवर या पिकांची पेरणी झाली आहे.

सध्या गहू, आणि हरभरा या पिकांची पेरणी करण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत. मात्र पाण्याची कमतरता असल्याने या पिकांच्या क्षेत्रातही घट होण्याची शक्यता आहे. मका पिकाची पेरणी १४ हजार ८३८ हेक्टर झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : अकोल्यात रब्बीची १०० टक्के पेरणी आटोपली

गतवर्षीच्या रब्बी हंगामात १ लाख २२ हजार ३९१ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. गतवर्षी रब्बीची १ लाख ८५ हजार २५१ हेक्टरवर पेरणी झाली, गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या क्षेत्रात १० टक्क्यांनी घट होईल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तालुकानिहाय रब्बीचे पेरणी क्षेत्र (हेक्टर)

तालुका क्षेत्र

मिरज १७ हजार ४९०

जत ६४ हजार ६५५

खानापूर ५ हजार ११३

वाळवा ५ हजार २५९

तासगाव १६ हजार २३६

शिराळा २ हजार १७५

आटपाडी १२ हजार ८०२

कवठेमहांकाळ १७ हजार ३००

पलूस ३ हजार २६४

कडेगाव ६ हजार २९०

एकूण १ लाख ५० हजार ५८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com