Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Rail Roko Movement : ‘रेल रोको’ने उत्तर भारत प्रभावित

Farmer Protest : पंजाब राज्यात भारतीय किसान युनियन उगराहा संघटनेने गुरुवारी पुकारलेल्या ‘रेल्वे रोको’ आंदोलनाने सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.

Team Agrowon

New Delhi : किमान आधारभूत मूल्याचे (एमएसपी) कायद्यात रूपांतरासह इतर १२ मागण्यांकरिता २०० शेतकरी संघटनांनी पुकारलेले ‘चलो दिल्ली’ आंदोलन तिसऱ्या दिवशी गुरुवारीही (ता.१५) सुरूच होते. केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरू असल्याने दिवसभर ठिय्या आंदोलन झाले. दुसरीकडे चार तासांच्या रेल रोको आंदोलनाने उत्तर-पश्‍चिम विभागातील सेवा प्रभावित झाली.

पंजाब राज्यात भारतीय किसान युनियन उगराहा संघटनेने गुरुवारी पुकारलेल्या ‘रेल्वे रोको’ आंदोलनाने सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. पंजाबातून जाणाऱ्या बहुतांश रेल्वे शेतकऱ्यांनी गुरुवारी अडविल्या, यामुळे उत्तर विभाग रेल्वे सेवा चांगलीच प्रभावित झाली. बहुतांश रेल्वे आंदोलन काळात बंद ठेवण्यात आल्या. शेतीमालाच्या एमएसपीला कायद्याची गॅरेंटी द्यावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी मंगळवारी (ता. २०) दिल्लीत मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला आहे.

केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांत दररोज चर्चा होत आहे. गुरुवारी सायंकाळीही चर्चा होणार होती. याशिवाय सर्व शेतकरी संघटनांची रात्री उशिरा बैठक होणार होती. यानंतर आंदोलनासंदर्भात पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते अनुक्रमे जगजितसिंग दालेवाल आणि श्रवण सिंग पांधेर हे नेतृत्व करत आहेत. २०२१च्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने पिकांना चांगले दराचे आश्‍वासन दिले होते, मात्र ते पूर्ण झाले नाही.

तसेच स्वामिनाथन अहवालानुसार किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) खात्री देणाऱ्या कायद्याची निर्मिती करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी आहे. दरम्यान, पंजाबातील पतियाळा, संगरूर, फतेहगड साहीब जिल्ह्यात इंटरनेट सेवा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार शुक्रवारपर्यंत (ता.१६) बंद ठेवण्यात आली आहे. हरियाना सरकारने अंबाला, कुरुक्षेत्र, कैठल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा जिल्ह्यांत यापूर्वी सेवा बंद केली आहे.

प्रियांकांचा केंद्राला सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली होती. मग ही आश्वासने का पूर्ण केली जात नाहीत. शेतकऱ्यांशी असा व्यवहार का केला जात आहे, असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी उपस्थित केला.

हरियानात आज टोल न देण्याचे आंदोलन

शेतकरी आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हरियानात आज (ता.१५) तीन तास कोणत्याही स्वरूपाचे टोल न देण्याचे आणि उद्या तहसील कार्यालयासमोर ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. यानंतर रविवारी (ता. १८) बैठक होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. भारतीय किसान युनियनने (चढुणी) विद्यमान आंदोलनात त्यांचा सहभाग नसला, तरी ही घोषणा केली आहे.

ज्या प्रमाणे सैनिक सीमेवर लढतात, त्याच प्रमाणे आंदोलनकर्ते शेतकरी हे आपल्या देशाकरिता लढत आहेत.
राहुल गांधी, काँग्रेस नेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT