Onion Cultivation : साधारणपणे १ एकर क्षेत्र लागवडीसाठी ५ गुंठे क्षेत्रावर केलेली रोपवाटिका पुरेशी होते. १ एकर क्षेत्र लागवडीसाठी साधारण २.५ ते ३ किलो चांगल्या प्रतीचे व चांगले उगवण क्षमतेचे बियाणे निवडावे.रोपवाटिकेसाठी जमिनीची मशागत जमिनीची खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. खोल नांगरणीमुळे विविध किडींच्या वेगवेगळ्या अवस्था उघड्या पडतात. त्यावर पक्षी ताव मारतात. गादीवाफे तयार करण्यापूर्वी मातीतील काडीकचरा आणि दगड काढून टाकावेत.गादीवाफे तयार करणे रोपांवर जमिनीतून येणाऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन मर, मूळकुज यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. तो टाळण्यासाठी पाण्याचा निचरा उत्तम होण्यासाठी जमिनीच्या पोतानुसार गादीवाफे तयार करणे गरजेचे आहे. साधारणपणे १ मीटर रुंदी व ३ ते ४ मीटर लांबीचे साधारण १० ते १५ सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार करून घ्यावेत. .खत व्यवस्थापनप्रत्येक वाफ्यात निंबोळी खत १ किलो, गांडूळ खत १ किलो, बारीक केलेले कुजलेले शेणखत २ ते ३ किलो, तर कॉपर ऑक्सिक्लोराइड ५० ग्रॅम हे बुरशीनाशक वापरून वाफे चांगले घोळून घ्यावेत.पेरणीपूर्वी अर्धा गुंठे (५०० चौ.मी.) क्षेत्रासाठी ४:१:१ किलो नत्र, स्फुरद, पालाश वापरावे.रोपवाटिकेतील तणे काढल्यानंतर ५०० चौ.मी. क्षेत्रासाठी २ किलो नत्र वापरावे..गादीवाफा पद्धतीचे फायदेकांद्याच्या नैसर्गिक वाढीसाठी आवश्यक भुसभुशीत माती, मुळांभोवती व कंदाभोवती असते. परिणामी जातीपरत्वे चांगला आकार कांद्यास मिळतो. त्याचे वजन वाढते. परिणामी हेक्टरी उत्पादनामध्ये २० टक्क्यांची वाढ होते.ठिबक सिंचनामुळे पाणी वापरात ६० टक्के बचत होते. आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य झाल्यामुळे वाफसा स्थिती सातत्याने राखणे शक्य होते. परिणामी मुळांची कार्यक्षमता सुधारून अन्नद्रव्य शोषण चांगल्या प्रकारे होते.ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर केल्यास पीक उत्पादनामध्ये वाढ होते. सिंचनासाठीच्या मजुरी खर्चात बचत साधते.अवकाळी पाऊस किंवा शेतामध्ये पाणी साचून होणारे कांद्याचे नुकसान गादीवाफ्यामुळे टाळता येते. गादीवाफ्यावर रोपे लावल्यानंतर मूळकुज, खोडकुज या प्रादुर्भाव टाळता येतो..Onion Crop Damage : लाखमोलाचा कांदा पावसामुळे मातीमोल.तणांचा बंदोबस्तकांदा बी पेरल्यानंतर उगवण होत असताना सोबत अन्य तणेही उगवून वाढतात. खुरपणी करणे कठीण व खर्चिक होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास तण जोमाने वाढून कांद्याची रोपे झाकून जातात. त्यामुळे रोपवाटिकेतील तणांच्या नियंत्रणासाठी बी पेरल्यानंतर ४८ तासांच्या आत वाफ्यावर पेंडीमिथॅलिन (३८.७% सीएस) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे तणांचे बी रुजत नाही. पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी हाताने तण काढून घ्यावे..बियाणे आणि बीजप्रकियाप्रथम बियाण्यास ३ ते ५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलोप्रमाणे चोळून घ्यावे. गादी वाफ्यावर १० सें.मी. अंतरावर, २ सें.मी. खोल रुंदीस समांतर रेषा ओढून घ्याव्यात. त्यात बी पातळपणे पेरावे. पेरलेले बी मातीने हलके झाकावे. वाफ्यांना बी उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावे.रोपे उगवून आल्यानंतर रोपांची वाढ होण्यासाठी प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम युरिया रोपांच्या दोन ओळींमधून द्यावा. आवश्यकतेनुसार बुरशीनाशकाच्या व कीटकनाशकांच्या फवारण्या १० ते १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात..रोग नियंत्रणरोपांना पीळ पडणे किंवा रोपाची मर तसेच ‘डॅम्पिंग ऑफ’ (रोपे कुजणे) यासाठी पेरणीनंतर ७ ते १० दिवसांनी दोन ते तीन वेळा ट्रायकोडर्मा या जैविक घटकाची १० मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी.रोपांना पीळ पडणे किंवा रोपाची मर यासाठी पेरणीनंतर १०-१५ दिवसांनी मेटॅलॅक्झिल (३५ टक्के) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.रोपांच्या पानावरील करपा (Stemphyllium leaf blight आणि Anthracnose) रोगांसाठी कार्बेन्डाझिम किंवा मॅन्कोझेब किंवा ट्रायसायक्लॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे गरजेनुसार फवारणी करावी.रोपांमध्ये फुलकिडे (थ्रिप्स) प्रादुर्भाव दिसत असल्यास फिप्रोनील किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे १० ते १५ दिवसाच्या अंतराने १ ते २ फवारण्या कराव्यात..Onion Crop Loss : सततच्या पावसाचा कांदा पिकाला फटका.लागवडीपूर्वी रोपांची तयारीसाधारण ६ ते ८ आठवड्यांचे रोप लागवडीस योग्य असते. लागवडीपूर्वी दोन ते तीन दिवस रोपांना हलके पाणी द्यावे. म्हणजे रोपे उपटण्यास सोपे जाते व रोपांची मुळे तुटत नाही. अधिक उंच वाढलेली रोपे असल्यास त्याचे शेंडे कापून घ्यावेत. लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस किंवा फिप्रोनिल १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात रोपांची मुळे बुडवून घ्यावीत. नंतरच शेतात लागवड करावी.बी पेरून लागवड करणेभारत, पाकिस्तान व बांगलादेश वगळता जगात सर्वत्र बी पेरून लागवड करतात. ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडून कांदा बियांची पेरणी केली जाते. यंत्रामुळे दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर व्यवस्थित राखता येते. बियांना प्रक्रिया करून त्यांच्या आकार वाढवला जातो, ट्रॅक्टरच्या साह्याने लांब गादीवाफे तयार करून त्यावर बी पेरले जाते. ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी दिले जाते.कांद्याची रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड करणे हे रोपवाटिकेचा खर्च व वाढत्या मजुरीमुळे अतिशय खर्चिक झाले आहे. बऱ्याच वेळा हंगामात पुरेसे मजूर उपलब्ध होत नाही. परिणामी, कांदा लागवडीला उशीर होतो. त्यामुळे सरळ बी पेरणीद्वारे कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे..या पद्धतीचे फायदे- तोटेपेरणी पद्धतीमध्ये रोपवाटिकेचा वेळ, खर्च आणि रोपांच्या पुनर्लागवडीचा खर्च वाचतो. हे खरे असले तरी बियाण्यांचे प्रमाण वाढवावे लागत असल्याने त्या खर्चात वाढ होते. शिवाय उत्पादनही समाधानकारक मिळत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.पेरणीसाठी योग्य यंत्राची उपलब्धता ही एक समस्या आहे. पारंपरिक पेरणी यंत्राचा वापर केल्यास बी खोल जाऊन उगवण कमी होण्याचा धोका असतो. पेरणीवेळी दोन ओळींमधील अंतर राखता आले तरी दोन रोपांमध्ये तूट पडत असल्याने ठरावीक अंतर राखण्यात अडचणी येतात. काही वेळा एका जागी २ ते ३ बिया रुजून कांदे लहान व चपट्या आकाराचे होतात. चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते.काही शेतकरी बी फेकून लागवड करतात. ही पद्धत तर एकदम चुकीची आहे. या पद्धतीत दोन ओळींत व दोन रोपांमध्ये योग्य अंतर राखता येत नाही. पातळ किंवा दाट बियाणे पडण्याचा धोका असतो. तो कमी करण्यासाठी बियांमध्ये २५ पट बारीक शेणखत मिसळून पेरणी करावी.रोपे लहान असल्यामुळे पिकात खुरपणी करणे अवघड जाते. तणांचा जोर रोपांपेक्षा अधिक राहिल्यास रोपांची वाढ खुंटते. सर्व पीक वाया जाते. ४५ दिवसांनी तणनाशकाची फवारणी करावी. .या पद्धतीत नांगे भरण्याची सोय नाही.पीक रोप लागवडीपेक्षा शेतात एक ते दीड महिना जादा राहत असल्यामुळे अधिक खुरपण्या व पाणी पाळ्या वाढतात.पीक संरक्षण खर्च वाढतो.डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.