Chh. Sambhajinagar News : नैसर्गिक आपत्तीत शेतकरी तसेच नुकसानग्रस्तांना वेळेत मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठीची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले..पापळकर यांनी मंगळवारी (ता. ७) अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, डीबीटीद्वारे नुकसान भरपाई वाटप, केरोसीन, धान्य वाटप, वाळू धोरण अंमलबजावणी व सेवा पंधरवाडा याबाबतचा सविस्तर आढावा मंगळवारी (ता. ७) घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी मंगळवारी (ता. ७) जिल्हानिहाय आढावा घेतला. .सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर बैठकस्थळी अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त श्रीमती मंजूषा मिसकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. पापळकर म्हणाले, की जिल्हानिहाय धान्य वाटपाचे नियोजनाचा आढावा घेत ही प्रक्रिया गतिमान करा तसेच नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीबाबत या बैठकीत चर्चा झाली. .Farmer Relief Package: पॅकेजच्या नावाखाली भोपळा.घरकुल व इतर शासकीय योजनांसाठी वाळूची उपलब्धता सुनिश्चित करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सेवा पंधरवडा या उपक्रमाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल विहित कालमर्यादेत सादर करा, असे निर्देश श्री. पापळकर यांनी दिले..खरडून गेलेल्या जमिनीचे स्वतंत्र पंचनामेशेती पिकांच्या नुकसानीसोबतच खरडून गेलेल्या जमिनीचे स्वतंत्र पंचनामे करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही पूर्ण करावी. ग्रामीण भागात रस्ते, पूल यासह ज्या विभागाच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यांनी आराखडा तयार करून आपल्या विभागाच्या सचिवाकडे पाठवावा, असे निर्देश श्री. पापळकर यांनी दिले..Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच.१६६८६१७.५ हेक्टर जमिनीचे पंचनामेछत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील १६६८६१७.५ हेक्टर जमिनीचे पंचनामे करण्यात आले असून, १४१८ कोटी ९६ लाख ८० हजार रुपये निधीसुद्धा प्राप्त झाला आहे. हा निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे त्यापैकी २१७.४२ कोटी इतका निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला असल्याचे बैठकीत सांगण्यात आले..सप्टेंबरमधील ७६ टक्के पंचनामेसप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ७६ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनाम्याचे काम सुरू आहे. हे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना श्री. पापळकर यांनी दिल्या. ३३ हजार ४३ बाधित कुटुंबांना धान्य वितरित केले असून, उर्वरित लोकांना सुद्धा धान्य वाटपाचे काम सुरू आहे.सेवा पंधरवडा या उपक्रमामध्ये अतिवृष्टी व पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांना प्रभावीपणे काम करता आले नाही. तरी पुढील १० दिवसांत सेवापंधरवाड्याचे उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत सूचनाही श्री. पापळकर यांनी दिल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.