Jalgaon News : खानदेशात सध्या मका, सोयाबीन कापणी, मळणीचे काम गतीने सुरू आहे. उडीद, मुगाची हानी निसर्गाच्या लहरीपणाने झाली. आता सोयाबीन, मका पीक घरात आणण्याची लगबग शेतकरी करीत आहेत. .ऊनही तापत आहे. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. रात्री गारठा असतो. सकाळी १० नंतर ऊन तापू लागते. कापूस वेचणीसह सोयाबीन, मका मळणीसाठी निरभ्र वातावरणाची प्रतीक्षा शेतकरी करीत होते. परंतु यंदा या महिन्याच्या सुरवातीलादेखील पाऊस होता. यामुळे कापणी, मळणीच्या कामास विलंब झाला..Crop Harvesting : उघडिपीमुळे पन्हाळ्यात पिके काढणीला वेग.आठवडाभरापासून ऊन, उष्णताखानदेशात मागील सात ते आठ दिवसांपासून ऊन व उष्णता अशी स्थिती आहे. कापूस पिकात बोंडे उमलण्याची गती वाढली आहे. तसेच सोयाबीन व मका पीकही मळणीवर आले आहे. सोयाबीन मळणीसाठी शेतकरी ट्रॅक्टरचलित यंत्रणेचा उपयोग करीत आहेत. मोठे हार्वेस्टर शेतात वाफसा नसल्याने जाऊ शकत नाहीत. यामुळे प्रथम मजुरांकरवी कापणी करून सोयाबीनचा ढीग केला जात आहे. यानंतर मळणीचे काम उरकून घेतले जात आहे. .काही हलक्या, मध्यम जमिनीत वाफसा असल्याने मोठ्या हार्वेस्टरने सोयाबीनची मळणी शेतकरी करून घेत आहेत. यासाठी एकरी १५०० ते १८०० रुपये खर्च येत आहे. तसेच काही तासात पाच ते सात एकरातील सोयाबीन पीक मळणी होऊन घरात आणता येत आहे..Crop Harvesting : कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे खरीप पीक काढणी ठप्प.दृष्टिक्षेपनीरभ्र वातवरण असल्याने एकाच वेळी कापणी, मळणी व कापूस वेचणीची कामे शिवारात सुरू केळी, पपई काढणीलाही आलीय गती केळी पक्व होवून काढणीला येण्याची प्रक्रियादेखील उष्णतेने अधिक .दिवाळी सणापूर्वी शेत तयार करण्याचे नियोजनजेथे सोयाबीन व मका पीक आहे. तेथे मळणी, कापणी करून लागलीच पूर्वमशागत करून घेण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत. कारण त्यात रब्बी पिकांची पेरणी केली जाईल. दिवाळीपूर्वी पेरणी झाल्यास पुढे लाभ दिसेल. थंडीचा फायदा पिकांना मिळेल, असे शेतकरी मानतात. यात दिवाळीच्या काळात मजुरटंचाई असते. या कालावधीत शेतीकामे ठप्प असतात. यामुळे शेतकरी या आठवड्यात कापणी, मळणीचे काम उरकून घेत आहेत. यात मध्येच ढगाळ वातावरण तयार होत असल्याने शेतकरी धसका घेत आहेत. कारण पुन्हा पाऊस आल्यास हानी वाढेल व हाती काहीच येणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.