Sugarcane Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season: एकाही कारखान्याला गाळप परवाना नाही

Team Agrowon

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे नांदेड विभागातील गाळप हंगाम २०२३-२४ साठी २९ साखर कारखान्यांनी गाळप परवानासाठी अर्ज सादर केले होते. यात २१ खासगी तर आठ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे,

परंतु या कारखान्यांना अद्याप गाळप परवाना मिळाला नाही. परवान्यापूर्वी कारखान्याने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचे पैसे भरण्याची सक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून मिळाली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे नांदेड नांदेड विभागात परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड विभागात मागीलवर्षी ३० साखर कारखाने सुरु झाले होते. यात १९ खासगी तर ११ सहकारी कारखान्यांचा समावेश होता.

चालू हंगाम २०२३-२४ या वर्षाचा गाळप हंगाम ता. १ नोव्हेबर पासून सुरु होत आहे. यासाठी विभागातील साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या मार्फत राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.

यात २१ खासगी तर आठ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. यंदा एकूण २९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज सादर केला आहे. परंतु शासनाने आदेश काढून कारखान्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाकडे मागील दोन वर्षाचे १७ रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम चार टप्यांत देण्याची सुविधा देण्यात आली आहे.

मागीलवर्षी गाळपासाठी अर्ज केलेले कारखाने

१) ट्वेंटीवन शुगर युनिट - १ २) विलास कारखाना -२ तोंडार, ३) रेणा कारखाना, ४) योगेश्वरी शुगर, ५) श्री तुळजाभवानी शुगर, ६) कपीश्वर शुगर, ७) श्री लक्ष्मी नरसिंह शुगर, ८) श्री रेणुका शुगर, ९) गंगाखेड शुगर, १०) श्री संत शिरोमणी मारोती महाराज, ११) एमव्हीके शुगर, १२) श्री सुभाष शुगर, १३) मांजरा कारखाना, १४) विलास यु -१ निवळी, १५) कुंटूरकर शुगर, १६) शिऊर शुगर, १७) जागृती शुगर, १८) ट्वेंटीवन शुगर यु-२, १९) ट्वेंटीवन शुगर यु-३, २०) टोकाई कारखाना, २१) पूर्णा कारखाना, २२) शेतकरी कारखाना, २३) ओंकार शुगर, २४) बळीराजा शुगर, २५) श्री साईबाबा शुगर, २६) भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यु -१, २७) भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यु -२, २८) सिद्धी शुगर, २९) शिवाजी सर्विस स्टेशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT