Urea Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Demand : रायगडमध्ये खरिपासाठी हवे ११,९३२ टन युरिया

Urea Shortage : आरसीएफ आणि जिल्हा कृषी विभागाच्‍या समन्वयामुळे रायगड जिल्ह्यातील युरियाचा पुरवठा अत्यंत सुरळीत असून, गतवर्षीच्या मागणीपेक्षा अधिक खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Team Agrowon

Raigad News : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्‍या (आरसीएफ) थळ प्रकल्पामध्ये वार्षिक नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी नियोजित शटडाउन करण्यात आले आहे; मात्र शटडाऊनचा युरिया खताच्या उत्पादनावर किंवा पुरवठ्यावर कुठलाही नकारात्मक परिणाम झाला नाही.

यंदाच्या खरीप हंगामासाठी ११,९३२ टन युरियाची मागणी करण्यात आली आहे, त्यापैकी ४४०.४१ टन युरिया आधीच वितरित करण्यात आल्‍याचे आरसीएफ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आरसीएफ आणि जिल्हा कृषी विभागाच्‍या समन्वयामुळे रायगड जिल्ह्यातील युरियाचा पुरवठा अत्यंत सुरळीत असून, गतवर्षीच्या मागणीपेक्षा अधिक खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याबद्दल माहिती देताना आरसीएफचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कवळे यांनी सांगितले, की गतवर्षी ११ हजार ५०० टन युरियाची मागणी असताना, आरसीएफने १२,०१९ टन युरिया उपलब्ध करून दिला होता. यामुळे शेतीची कामे वेळेत सुरू झाली, तसेच उत्पादनात कुठलाही अडथळा आलेला नाही.

सध्या स्थानिक वितरकांकडे ७७२.५५ टन युरिया साठा उपलब्ध असून, शेती हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी कोणतीही अडचण नाही. शेतकऱ्यांना खताच्या तुटवड्याची भीती न बाळगता शेती कामे अधिक जोमाने सुरू ठेवावीत. यंदा पाऊस वेळेत येणार असून, नियोजनबद्ध पद्धतीने तयारी पूर्ण करावी, असेही आरसीएफ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या आवाहनानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेती कामांना सुरुवात केली आहे.

टंचाईची एकही तक्रार नाही

गतवर्षी रायगड जिल्ह्यात युरियाच्या टंचाईबाबत एकही तक्रार आली नव्हती आणि यंदाही तीच परंपरा कायम राहील, असा आत्मविश्वास आरसीएफने व्यक्त केला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी ११,९३२ मेट्रिक टन युरियाची मागणी करण्यात आली आहे, त्यापैकी ४४०.४१ मेट्रिक टन युरिया वितरित झाला असून उर्वरित साठा पुढील चार ते पाच महिन्यांत नियोजित पुरवण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Subsidy : महाडीबीटीच्या यंत्र वा अवजारांची खरेदी देयक ३० दिवसांनंतरही अपलोड करता येणार; कृषी विभागाने केली अट शिथिल

Kul Kayda: जाणून घेऊयात कूळ कायदा

Bihar Election Results 2025: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? 'जेडीयू'नं केलेली पोस्ट डिलीट केल्यानं चर्चेला उधाण

Maharashtra Politics: शतप्रतिशत भाजप

Animal Blood Transfusion: रक्त संक्रमण करतेवेळी जनावरांची काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT