Sugarcane Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : उसाच्या ४०० रुपये हप्त्याबाबत तोडगा नाही

Sugarcane FRP : गेल्या हंगामातील उसाला प्रती टन चारशे रुपये मिळावेत या शेतकरी संघटनांच्या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी गुरुवारी (ता. १२) बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.

Team Agrowon

Kolhapur News : गेल्या हंगामातील उसाला प्रती टन चारशे रुपये मिळावेत या शेतकरी संघटनांच्या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी गुरुवारी (ता. १२) बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला उर्वरित चारशे रुपये द्यावेत, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.

यासह अन्य शेतकरी संघटना ही याबाबतची मागणी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीस निमंत्रित केले होते.

यात तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते परंतु कोणताही तोडगा निघाला नाही. संघटनांच्या भूमिकेवर कारखानदारांनी कोणतीही ठोस भूमिका वा निर्णय घेतला नाही.

राजू शेट्टी यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, की जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील उसाला ‘एफआरपी’प्रमाणे दर शेतकऱ्यांना दिला आहे. मात्र साखरेचा दर चांगला असल्याने साखर कारखानदारांनी किमान ४०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम द्यावी, अशी आमची मागणी आहे.

यावर जिल्हाधिकारी रेखावर यांनी कारखानदारांमधील कोणाला बाजू मांडायची आहे का, याबाबत विचारणा केली. परंतु कोणत्याही कारखाना प्रतिनिधींनी ४०० रुपये जादा दर देण्यावर भाष्य करण्याचे टाळले.

गुरूदत्त कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे म्हणाले, की यंदा साखरेला चांगला भाव आहे हे आम्हाला मान्य आहे. परंतु साखर कारखानदारांसमोर काही अडचणी आहेत त्या आम्हाला सोडवाव्या लागत आहेत. सरकारच्या नियमानुसार ‘एफआरपी’ तीन तुकड्यात द्यायचा कायदा असूनही आम्ही एकरकमी ‘एफआरपी’ देत आहोत.

कारखानदार आणि शेतकरी संघटना यांनी मांडलेल्या भूमिकेवर जिल्हाधिकारी रेखावार यांनी मी दोन्ही बाजूच्या भूमिका सरकारकडे मांडणार आहे. याबाबत पुढील बैठकीत काहीतरी यातून मार्ग निघेल, असे सांगितले.

ज्या कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील ऑनलाईन पद्धतीने माहिती दिली नाही त्या कारखानदारांवर १५ दिवसांनंतर कारवाई करण्याचे आदेश साखर सहसंचालकांना देण्यात आले.

बैठकीत दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, जैव इंधन शेतकरी संघटनेचे शामराव देसाई, आदींसह विविध कारखान्याचे पदाधिकारी व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT