Farm Road Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road Issue : शेतरस्त्यांची दयनीय अवस्था

Farm Road Development : तेल्हारा तालुक्यात १०८ गावे आहेत. त्यातील काही गावांमध्येच पाणंद रस्त्यांची कामे झाली आहेत. पण या कामांचेही गुणवत्तेचे हाल झाले आहेत.

Team Agrowon

Akola News : तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. वाढीव निधी मंजूर न झाल्याने २६ गावांमध्ये पाणंद रस्ते पूर्णत्वास गेले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना शेतात पोहोचणेही अवघड बनले आहे. अशा स्थितीत शेती करावी तरी कशी? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

रस्त्यांविना शेतात जाणे, बैलजोडी किंवा ट्रॅक्टर नेणे अशक्य झाले आहे. अनेक गावांमध्ये शेतात पीक घेण्यासाठी लागणारी अवजारे, खतं, बियाणे यांचा पुरवठा करणे ही मोठी डोकेदुखी बनली आहे. विशेषतः पावसाळ्यात मातीच्या रस्त्यांवर पाय ठेवणेही अवघड बनते.

तेल्हारा तालुक्यात १०८ गावे आहेत. त्यातील काही गावांमध्येच पाणंद रस्त्यांची कामे झाली आहेत. पण या कामांचेही गुणवत्तेचे हाल झाले आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले काही रस्ते सध्या खड्ड्यांनी भरले आहेत. या रस्त्यावरून ट्रॅक्टर तर सोडाच, बैलजोडीही नेत येत नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अपुरा निधी...

मागील वर्षी एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २० लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र, २० लाखात रस्ता बनणे अशक्य असल्याने ४५ लाखांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी किमान ४५ लाख रुपयांची गरज आहे. त्यामुळेच २६ गावांतील रस्त्यांचे काम रखडले आहे.

‘‘अहवाल शासनाकडे पाठवला असून वाढीव निधी मंजूर झाल्यानंतर रस्त्यांची कामे हाती घेतली जातील.’’
- समाधान सोनवणे, तहसीलदार
‘‘शेतात पोहोचण्यासाठी रस्ताच नसेल, तर उत्पादन घेणार कसे. पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत खडतर झाली आहे. शासनाने निधी मंजूर करून त्वरित कामे सुरू करावीत.’’
- उद्धव मानखैर, तळेगाव बाजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT