Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Certified Seed Sale : बनावट, कालबाह्य, अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस पायबंद

Agriculture Inputs : बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस पायबंद घालण्याच्या उद्देशाने शासनाने आता कठोर पावले उचललीत आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस पायबंद घालण्याच्या उद्देशाने शासनाने आता कठोर पावले उचललीत आहेत. त्यात बियाणे विक्रीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून देण्यात येणारे सत्यप्रत बियाणे आता साथी पोर्टलवर नोंदणी करूनच दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदीत होणारी फसवणूक आणि बोगस बियाण्यांच्या वापरानंतर होणाऱ्या आर्थिक नुकसानीला ब्रेक लागणार आहे.

शेतकऱ्यांना प्रमाणित आणि योग्य खत उपलब्ध व्हावे आणि बियाणे खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुका कृषी विभागाने तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण कमिटी गठीत केल्याची माहिती तालुका कषी अधिकारी अनिल गावित यांनी दिली. या व्यतिरिक्त भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून भरारी पथके कार्यान्वित झाल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मेच्या पहिल्या आठवड्यापासून या वर्षीच्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतांमधील शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यामध्ये आली असून खरीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये शेतकरी गुंतला आहे. त्यामध्ये बियाणे, खते खरेदीचे नियोजन शेतकऱ्यांकडून केले जात आहे.

अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विविध जातीच्या भात बियाण्यांची विक्री केली जाते. काहीवेळा बोगस बियाण्याची विक्री होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होते. बोगस बियाण्यांच्या वापरामुळे रोपांची पुरेशी उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जातात.

त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभाग आतापासून सक्रिय झाला आहे. त्यातून, शेतकऱ्याच्या बियाण्यांबाबत तक्रारी येऊ नयेत, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी स्वतंत्र प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारचे बियाणे साथी पोर्टलवरून विक्रीचे बंधन कृषी विभागाने कंपन्यांना घातले .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: दोन दिवसांनंतर पावसाचा जोर वाढणार; पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवड्यात पावसाचा अंदाज

Crop Insurance : अहिल्यानगरमध्ये खरीप पीकविम्याला प्रतिसाद कमीच

Turmeric Farming: हळदीमध्ये करपा, कंदकुजीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न

Agriculture Investment: शेतीचा भांडवली खर्च वाढेल

Shibu Soren Dies: झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन

SCROLL FOR NEXT