Cotton Seed Rate : कापसाच्या प्रत्येक पाकिटाची ९०१ रुपये किंमत निश्चित

Cotton Cultivation : खरीप हंगामाला महिनाभरात सुरुवात होत आहे. राज्यातील अनेक भागात कापसाची लागवड केली जाते. अलीकडे कापसाचे क्षेत्र वाढत आहे.
Cotton Seed
Cotton Seed Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : खरीप हंगामात (२०२५-२६) कापसाच्या बियाण्यांची विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे. कापसाच्या ४७५ ग्रॅम वजनाच्या बीजी-१ च्या पाकिटासाठी ६३५ रुपये व बीजी-२ साठी ९०१ रुपये किंमत निश्चित केली असून तसे राजपत्र भारत सरकारने प्रसिद्ध केले आहे. यापेक्षा अधिक दराने विक्रेत्यांना कापसाचे बियाणे विकता येणार नाही. गतवर्षीपेक्षा प्रति पाकिटामागे यंदा ३७ रुपये दर वाढले आहेत.

खरीप हंगामाला महिनाभरात सुरुवात होत आहे. राज्यातील अनेक भागात कापसाची लागवड केली जाते. अलीकडे कापसाचे क्षेत्र वाढत आहे. यंदाही (२०२५-२६) कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज धरुन कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे. राज्यात बहुतांश भागात बीजी-२ बियाणांची शेतकरी लागवड करण्याला प्राधान्य देत आहेत.

Cotton Seed
HTBT Cotton Seeds: प्रतिबंधित एचटीबीटी गुप्त व्यापार सीमेवर पोहोचला

यंदाच्या हंगामासाठी कापसाच्या ४७५ ग्रॅम बियाणे पाकिटाची निविष्ठा विक्रेत्यांसाठी विक्री किंमत निश्चित करणारे राजपत्र भारत सरकारने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार बीजी-१ च्या पाकिटासाठी ६३५ रुपये आणि बीजी-२ साठी ९०१ रुपये किंमत निश्चित केलेली आहे. गेल्यावर्षी हे पाकीट ८६४ रुपयाला होते, म्हणजे गतवर्षीपेक्षा (२०२३-२४) बीजी-२ कापसाच्या प्रति पाकिटाची किंमत २७ रुपयांनी वाढली आहे. २०२२-२३ या हंगामात या पाकिटाची किंमत ८५३ रुपये होती.

कापूस लागवड सुरू झाली की मागणी असलेल्या कापसाच्या काही वाणांची अधिक दराने विक्री केली जात असल्याचा अनुभव आहे. त्यात बनावट बियाणे विक्री होण्याचीही शक्यता असते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा अधिक दर देऊ नये, अधिकृत निविष्ठा विक्री दुकानातूनच खरेदी करावी आणि पक्की पावती घ्यावी, असे कृषी विभागाकडून वारंवार आवाहन केले जात आहे.

Cotton Seed
HTBT Cotton Seed : सव्वा लाखाचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे जप्त

दारावर, ऑनलाइन खरेदी करुन नये

कापसाचा हंगाम सुरू झाला की बियाणे विक्रीचे फंडे सुरू होतात. काही लोक थेट दारावर येऊन मागणी असलेल्या बियाण्यांची थेट शेतकऱ्यांना विक्री करतात. याशिवाय बाजार दरापेक्षा कमी दराने विक्री करतात.

सध्या अधिक प्रभाव असलेल्या सोशल माध्यमातूनही ऑनलाइन बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता दिसतेय. या बाबत शेतकऱ्यांनी सजग राहावे. अशा पद्धतीने अजिबात खरेदी करू नये. तसा प्रकार आढळला तर कृषी विभागाशी संपर्क करावा, असे अहिल्यानगरचे जिल्हास्तरावरील भरारी पथकाचे प्रमख, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com