Farmer Loan Waiver Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी लवकरच समिती; पण मर्सिडीजवाल्या श्रीमंतांना नाही: महसूलमंत्री बावनकुळे

Loan Relief 2025: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची तयारी दर्शवली असून केवळ गरजू आणि खरी शेतकरी पात्र असतील. मर्सिडीज चालवणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Sainath Jadhav

Amravati News: राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी तयार असून त्यासाठी उच्चस्तरीय समिती लवकरच जाहीर होणार आहे. मात्र ही कर्जमाफी केवळ खरी गरजूंना मिळणार असून, श्रीमंत आणि बनावट गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार नाही, असे स्पष्ट विधान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

ज्यांनी शेतीच्या नावावर कर्ज घेऊन मर्सिडीज गाड्या, फार्महाऊस घेतले, अशा श्रीमंतांना कर्जमाफी मिळणार नाही." असे लोक ‘गरजू शेतकरी’ म्हणवून कर्जमाफी घेतात, ही गोष्ट अन्यायकारक आहे. अशा बनावट गरजूंना कर्जमाफी मिळणार नाही, हे सरकारने ठरवलं आहे. सरकारचा उद्देश फक्त खऱ्या शेतकऱ्यांना, ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांनाच मदत करणे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती येत्या पावसाळी अधिवेशनात जाहीर केली जाईल. येत्या ३० जून ते १८ जुलै या कालावधीत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी हा मुख्य मुद्दा असेल.

बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. ३ जुलै रोजी विधानभवनात मंत्र्यांसोबत आणि आमदार बच्चू कडू यांच्यासह एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत ठोस निर्णय घेतले जातील.

"आम्ही लवकरात लवकर गरजू शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत," असे बावनकुळे यांनी नमूद केले. याशिवाय, सरकारने शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे शेतीसाठी वीजबिल माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

तसेच, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळत होते, आता ही रक्कम २,१०० रुपये करण्याचा सरकारचा मानस आहे. या अधिवेशनात शाळांमधील हिंदी भाषेची सक्ती आणि शक्तीपीठ महामार्ग यासारख्या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांनीही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables: आहारात हव्यात आरोग्यदायी रानभाज्या

Water Conservation: श्रद्धा-सबुरी संस्थेने रुजविला जलसंधारणाचा पॅटर्न

Ganeshotsav 2025 : 'साम'च्या गणरायाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आरती

Global Startup: स्टॅनफर्ड विद्यापीठ : संशोधन, नवोन्मेषाचा जागतिक दीपस्तंभ

Weekly Weather: उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT