Agricultural Pump Electricity : दहा अश्वशक्तीच्या कृषिपंपांचेही वीजबिल माफ करण्याची मागणी

Agri Electricity Bill Waive : शासनाने कृषिपंपांना मोफत वीज व या पंपांचे वीजबिल थकबाकी माफीची घोषणा केली आहे. परंतु ही सवलत किंवा माफी फक्त पाच ते साडेसात अश्वशक्तीच्या कृषिपंपांसाठी आहे.
Agriculture Pump Electricity
Agriculture Pump Electricity Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : शासनाने कृषिपंपांना मोफत वीज व या पंपांचे वीजबिल थकबाकी माफीची घोषणा केली आहे. परंतु ही सवलत किंवा माफी फक्त पाच ते साडेसात अश्वशक्तीच्या कृषिपंपांसाठी आहे. १० अश्वशक्तीच्या कृषिपंपांना यातून वगळण्यात आले आहे. खानदेशात सुमारे पाच लाख कृषिपंप १० अश्वशक्तीचे असून, या पंपांनाही थकबाकी व वीजबिल माफीचा लाभ मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पण ती प्रलंबित आहे.

शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांनीही याबाबत निवेदन दिले. विविध मागण्या केल्या आहेत. याबाबत मागील काही महिने पाठपुरावा झाला. पण शासनाने दखलच घेतली नाही. जिल्ह्यात फक्त एक लाखांपर्यंतचे कृषिपंप सातेसात अश्वशक्तीपर्यंतचे आहेत.

चोपडा तालुक्यात फक्त नऊ हजार कृषिपंप साडेसात अश्वशक्तीपर्यंतचे आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख कृषिपंप आहेत. यात कमाल कृषिपंप १० अश्वशक्ती व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीचे आहेत. अधिक अश्वशक्तीचे कृषिपंप रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा आदी भागांत आहेत.

Agriculture Pump Electricity
Agriculture Electricity Crisis : विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

धुळ्यात एकूण तीन लाख कृषिपंप आहेत. यातही अनेक कृषिपंप १० अश्वशक्तीचे आहेत. नंदुरबारमध्येही सुमारे साडेतीन लाख कृषिपंप असून, या जिल्ह्यातही अनेक कृषिपंपधारक वीजबिल व थकबाकी माफीपासून वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करण्याचा प्रकार शासन करीत आहे. पाणीपातळी खोल गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना १० अश्वशक्तीचे कृषिपंप वापरावे लागतात.

Agriculture Pump Electricity
Agriculture Electricity : शेतीपंपांला आठऐवजी पाचच तास वीजपुरवठा

राज्यात अन्य भागात तीन, पाच अश्वशक्तीच्या कृषिपंपांच्या मदतीनेही पाणीउपसा विहिरीतून करता येतो. अशी स्थिती जळगाव, धुळे किंवा अन्य भागांत नाही. कारण काही शेतकऱ्यांना ६०० ते एक हजार फूट खोलीवरून पाणी उपसा करावा लागतो.

मोठ्या अंतराच्या, क्षमतेच्या जलवाहिन्या आहेत. यामुळे अधिक अश्वशक्तीचे पंपधारक अधिक पाणी उपसतात व अधिकचा नफा मिळवितात, असे होत नाही. सर्व शेतकऱ्यांसाठी एकसारखे धोरण शासनाने आणले पाहिजे, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

पाच व साडेसात अश्वशक्तीचे पंपधारकही संभ्रमात

पाच अश्वशक्तीच्या कृषिपंपांचे वीजबिलही शासनाने अलीकडच्या महिन्यांसाठी माफ केल्याचे आदेश जारी केलेले नाहीत. फक्त निवडणुकीपूर्वी पाच व साडेसात अश्वशक्तीच्या पंपांसंबंधी काही महिन्यांचे वीजबिल माफ केल्याचे आदेश जारी झाले. संबंधित कालावधीचे शून्य वीजबिल शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु अलीकडे असे शून्य वीजबिल पाच व साडेसात अश्वशक्तीच्या कृषिपंपधारकांना आलेले नाही. यामुळे पाच व साडेसात अश्वशक्तीचे कृषिपंपधारकही संभ्रमात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com