Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Linking : खतांचे लिंकिंग खपवून घेणार नाही ः आयुष प्रसाद

Kharif Season 2025 : खते, बियाण्यासमवेत कुठलीही खते व अन्य बाबींची लिंकिंग कुणीही करू नये. असा प्रकार केल्यास कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला.

Team Agrowon

Jalgaon News : खरीप हंगाम सुरू होत आहे. शेतकरी आपल्यासाठी महत्त्वाचा घटक असून, त्यांना खते, बियाणे मुबलक व वेळेत मिळायला हवीत. खते, बियाण्यासमवेत कुठलीही खते व अन्य बाबींची लिंकिंग कुणीही करू नये. असा प्रकार केल्यास कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला.

खरिपाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध मुद्दे मांडले.

ते म्हणाले, की लिंकिंगचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारांवर तत्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विकास बोरसे, कृषी केंद्र सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजूअण्णा पाटील, सचिव कैलास मालू, कृषी विभागाचे अधिकारी, खत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीतील प्रमुख मुद्दे

अंतरपीक लागवडीचा प्रभावी प्रचार व प्रसार करावा

सर्व खते मागणीनुसार योग्य प्रमाणात व वेळेत उपलब्ध करून द्यावीत

कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी अचुक सल्ला द्यावा

जिल्ह्यात खते, बियाणे मुबलक आहेत. डीएपीला पर्याय म्हणून नॅनो डीएपी आहे. एकाच वाणाचा आग्रह शेतकऱ्यांनी करू नये. पण कुठे गैरप्रकार असल्यास त्यावर कडक कारवाईदेखील केली जाईल. बोगस बियाण्यासंबंधी कृषी विभागाने तपाासणी, मोहीम राबविली आहे.
- पद्मनाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: आले दरात सुधारणा; जिऱ्याचे भाव टिकून, कांद्यात काहीसे चढ उतार, गव्हाचे दर स्थिर, पपईची आवक कमीच

Agriculture Scheme: नांगर, रोटाव्हेटरसह १२ अवजारांसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान; यांत्रिकीकरणाला सरकारकडून प्रोत्साहन

Brinjal Farming: दर्जेदार उत्पादनासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन

Soil Health: सांगलीतील जमिनीत सेंद्रिय कर्ब, नत्र यांची कमतरता

Agriculture Technology: भाजीपाला सुकविण्यासाठी यंत्रणा

SCROLL FOR NEXT