
Solapur News : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बोगस बियाणे, खते विक्री व लिंकिंग रोखण्यासाठी कृषी विभागाने १२ पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच शेतकऱ्यांची जागृती घडवण्यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर क्यूआर कोड लावण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना खतांचे दरपत्रकही कळणार आहे. शिवाय तक्रारी असल्यास शेतकरी त्यावरील व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करू शकतील. खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. त्यानुसार खतसाठा उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस पडला आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाफशाची प्रतीक्षा असून, वाफसा मिळताच पेरणीला सुरुवात होणार आहे. दरवर्षी बोगस बियाणे, खतांची विक्री व लिंकिंग होत असल्याच्या तक्रारी असतात. गतवर्षी राज्य सरकारच्या कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या एकूण ३४ निरीक्षकांनी ४१३ निविष्ठांचे नमुने घेतले होते.
उद्दिष्टाच्या तुलनेत १३ नमुने अधिक होते. त्यापैकी १०१ नमुने अप्रमाणित आढळले होते. त्यापैकी १८ प्रकरणांत ताकीद दिली होती. तर १८ नमुने पुनर्तपासणीसाठी सादर केले होते. त्यातील ११ नमुने त्यात उत्तीर्ण झाले होते, तर सात नमुने अप्रमाणित आढळले होते. ६२ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. १० प्रकरणे न्यायालयात दाखल केली होती.
प्रत्येक तालुक्यासाठी पथक
कृषी निविष्ठांच्या तपासणी व नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक तर जिल्हास्तरावर एका पथकाची नेमणूक केली आहे. या १२ पथकांमार्फत जिल्ह्यातील कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेसह विक्रीतील गैरप्रकार टाळण्यावर नजर राहणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.