Jalna News : केंद्र शासनामार्फत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची भूमी अभिलेखकडे नोंदणी अद्ययावत असणे, ई-केवायसी प्रमाणिकरण व बँक खाती आधार संलग्न असणे आवश्यक आहे. परंतु, तालुक्यात शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदणी अर्थात ‘लॅण्ड सिंडिग’ बाकी असल्याने संबंधित शेतकऱ्यांना पीएम किसानच्या पुढील किस्तीचा लाभ मिळेल अथवा नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सीमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरित या पैशांचा वापरही करता येतो.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जाऊन लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय एक रुपयाही खर्च न करता योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे.
त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १६ व्या हप्त्याची रक्कम मिळाली असून लवकरच १७ व्या हप्त्याची रक्कम लवकरच प्राप्त होणार आहे. सदर हप्त्याच्या लाभासाठी केंद्र सरकारने तीन बाबी बंधनकारक केल्या असून त्याची पूर्तता न केलेल्यांना मदत निधी मिळणार नाही.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात चकरा मारतात. परंतु, संबंधित अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतात यामुळे त्यांना माघारी जावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
अनेकदा कागदपत्रांची पूर्तता करून देखील या योजनेचा लाभ मिळत नाही. याकडे संबंधित अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.चंद्रकला खरात, शेतकरी, परतूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.