River Barrage Agrowon
ॲग्रो विशेष

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

Water Storage : शेळगाव बॅरेजमध्ये भूसंपादन व अन्य तांत्रिक कारणांनी आणि वरखेड बॅरेजमध्ये गिरणा पट्ट्यात पाऊस नसल्याने जलसंचय होणार नाही, असे दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव आदी भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या गिरणा नदीवरील वरखेडे लोंढे बॅरेज व तापी नदीवरील शेळगाव (ता. जळगाव) येथील बॅरेजमध्ये यंदाही १०० टक्के जलसंचय होणार नाही, अशी स्थिती आहे.

शेळगाव बॅरेजमध्ये भूसंपादन व अन्य तांत्रिक कारणांनी आणि वरखेड बॅरेजमध्ये गिरणा पट्ट्यात पाऊस नसल्याने जलसंचय होणार नाही, असे दिसत आहे. पावसाळ्याचा मोठा कालावधी संपला आहे. ऑगस्ट महिन्यात मागील वर्षी गिरणा धरण १०० टक्के भरले व त्यातून विसर्ग सुरू झाला होता. यंदा गिरणा धरण सुमारे ६६ टक्के भरले आहे.

त्यातून विसर्ग सुरू होईल की नाही, याची शाश्‍वती, खात्री नाही. कारण पाऊस नाही. तसेच काही बाबींसाठी भूसंपादनही करायचे आहे. यामुळे वरखेड बॅरेजमध्ये १०० टक्के जलसंचय होणार नाही. किंवा मध्यम प्रकल्पात यंदाही जलसंचय झालेला नाही. या प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यात यंदा १०० टक्के जलसाठा असेल, असा दावा या वर्षाच्या सुरुवातीला केला जात होता.

पण हा दावा फोल ठरेल, असे दिसते. वरखेडे लोंढे बॅरेजचे काम गेल्या सरकारने वेगात केले. नदीकाठच्या किंवा प्रकल्पानजीकच्या भागातील क्षेत्रात पुनर्भरणासाठी होईल, असे संकेत होते. पण या प्रकल्पात पुरेसा जलसाठाच नाही. १०० टक्के जलसाठा होऊ शकणार नाही. या प्रकल्पाच्या मदतीने परिसरातील सुमारे अडीच हजार हेक्टरला लाभ होणार आहे. पण यंदा पाऊस नाही व अन्य अडचणीदेखील आहेत.

शेळगाव बॅरेजबाबतही अडचणी

शेळगाव बॅरेजसंबंधीदेखील भूसंपादनाचे मुद्दे अपूर्ण आहेत. तापी नदीत पाण्याची आवक आहे. हतनूर धऱणातून विसर्ग सुरू आहे. पुढे हे पाणी शेळगाव बॅरेजमध्ये येते. पण भूसंपादनाअभावी शेळगाव बॅरेजमध्ये १०० टक्के जलसंचय करता येणार नाही.

या प्रकल्पाचे कामही ९९ टक्के पूर्ण झाले आहे. पाणी या भागात पुरेसे आहे. पण तांत्रिक अडचणी आहेत. मागील वर्षीदेखील तांत्रिक अडणींमुळे शेळगाव बॅऱेजमध्ये १०० टक्के जलसाठा होवू शकला नव्हता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chandrapur Water Crisis: वाढत्या उष्णतेने चंद्रपूर होरपळले, जलसाठा ४५ टक्क्यांवर

Nanaji Deshmukh Project: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात ग्रामस्तरावरच अर्ज रखडले

Fertilizer Dealer Action: खत लिंकिंग केल्यास संबंधित विक्रेत्यावर होणार कठोर कारवाई: कृषी अधिकारी विवेक कुंभार

Banana Crop Damage: वादळामुळे केळीचे पीक जमीनदोस्त

Soybean Seeds Availability: खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाण्याचा मोठा साठा उपलब्ध

SCROLL FOR NEXT