Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Storm Damage Compensation : वादळात नुकसानीची भरपाई मिळेना

Crop Compensation Update : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीटीत मोठ्या क्षेत्रातील विविध भागात पिकांची हानी झाली आहे. परंतू अजुनही भरपाई शासनाकडून मिळालेली नाही.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीटीत मोठ्या क्षेत्रातील केळी व इतर पिके, बागांची हानी विविध भागात मागील कालावधीत झाली आहे. परंतु भरपाई शासनाकडून मिळालेली नाही. केळी उत्पादकदेखील वादळात नुकसान भरपाईपासून विमा कंपनीच्या आडमुठेपणामुळे वंचित आहेत.

२०२२-२३ मध्ये फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यातील सुमारे ७७ हजारांवर शेतकरी सहभागी झाले. या शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या केळीची जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर आदी भागात हानी झाली. विमा योजनेतून नुकसानीची पातळी, स्थिती लक्षात घेऊन भरपाई दिली जाते.

ही भरपाई कमाल ७५ हजार रुपये एवढी प्रतिहेक्टरी मिळते. त्यात जिल्ह्यात वादळात केळीची ३० ते ८० टक्के एवढे नुकसान झाले. रावेरातील उत्तर, पूर्व व मध्य भागात मोठी हानी झाली होती. तसेच मुक्ताईनगर, जळगाव, यावल, चोपडा भागातही केळीचे वादळात नुकसान झाले. परंतु परतावे किंवा भरपाई योजनेचा कालावधी संपून सहा महिने पूर्ण होत आले तरीदेखील मिळालेली नाही.

सुमारे पाच हजार तक्रारी वादळात नुकसानीसंबंधी विमा कंपनीकडे प्राप्त झाल्या होत्या. यातील किती तक्रारींवर कार्यवाही झाली, किती शेतकऱ्यांना परतावे दिले जाणार, त्यासाठी काय तरतूद विमा कंपनीने केली आहे, याची माहिती दिली जात नाही.

नुकसानग्रस्त विमाधारक विमा कंपनीशी संपर्क करतात. पण योग्य माहिती मिळत नाही. यामुळे शेतकरी हवालदील झाले असून, प्रशासन, शासनाने याबाबत लक्ष देवून कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

भडगावातील शेतकरीही प्रतीक्षेत

जिल्ह्यात दरवर्षी वादळात केळी व इतर फळबागा, रब्बी पिकांची हानी होते. त्याचे पंचनामे शासन करते. परंतु शासनाकडून भरपाई दिली जात नाही. भडगाव तालुक्यात जून १०१९ मध्ये वादळात केळी व इतर फळबागांचे नुकसान झाले होते. यात ४१३ हेक्टरवरील बागांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच भाजीपाला पिकांसह चाऱ्याची हानी झाली होती. खरीप व रब्बी त्याचे हंगामात दरवर्षी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.

२०१९ मधील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. नुकसान किती झाले, याची माहिती घेऊन तसा अहवाल प्रशासनाने शासनास सादर केला. परंतु अद्यापही नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. शासन नुकसानीची टक्केवारी कमी असल्याचे सांगून कार्यवाही करीत नाही. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT