Bird Agrowon
ॲग्रो विशेष

Bird Species : वायंगणीत पक्ष्यांच्या नव्वद प्रजाती आढळल्या

Biodiversity : सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील वायंगणी (ता. मालवण) परिसरात पक्ष्यांच्या नव्वद प्रजाती आढळून आल्या असून, संकटग्रस्त प्रजातीमधील राखी डोक्याचा बुलबुल या पक्ष्याचा समावेश आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील वायंगणी (ता. मालवण) परिसरात पक्ष्यांच्या नव्वद प्रजाती आढळून आल्या असून, संकटग्रस्त प्रजातीमधील राखी डोक्याचा बुलबुल या पक्ष्याचा समावेश आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्षी निरीक्षकांनी ही पक्षी गणना केली आहे.

मालवण तालुक्यातील वायंगणी हे निसर्गसंपन्न गाव म्हणून ओळखले जाते. या गावात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आणि पाणथळ जागा आहेत.

त्यामुळे या गावपरिसरात कित्येक पशुपक्षी आढळून येतात. दरम्यान, पक्षी निरीक्षक डॉ. श्रीकृष्ण मगदुम यांनी पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबरला गावातील पक्ष्यांच्या गणनेला सुरुवात केली.

त्याकरिता गावातील ज्ञानदीप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. दरम्यान, पक्षी गणनेत त्यांना पक्ष्यांच्या ९० प्रजाती आढळून आल्या.

यामध्ये संकटग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी डोक्याचा बुलबुल पक्ष्याचा समावेश आहे. याशिवाय शिंजिर, फुलटोचा, शिपाई बुलबुल, शिंपी, पल्लवपुच्छ कोतवाल, तांबट, कुटुरगा असे तब्बल ९० पक्षी आढळून आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT